महागाईच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे दौंड येथे धक्का मारो आंदोलन


महागाईच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे दौंड येथे धक्का मारो आंदोलन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

१५/०६/२०२१ मंगळवार रोजी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडीच्या वतीने दौंड तहसीलदार कचेरी येथे धक्का मारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या होत्या १) पेट्रोल डिझेल गॅस च्या भरमसाठ वाढलेल्या किमती कमी करा. २) खाद्यतेल तसेच जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे भाव कमी करा. ३) वीज बिल माफ करा आणि ४ थी सर्वात महत्त्वाची अशी मागणी होती की महागाई कमी करता येत नसेल तर खुर्ची खाली करा. या आंदोलनाच्या वेळी,  महंगाईकी मार EVM की सरकार,काँग्रेस बीजेपी ने क्या किया ❓   देश का सत्यानाश किया... ❗

 ये सरकार वो सरकार..  दलाल भडवोंकी सरकार..वाहरे ... मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेंगा तेल


 अशा विविध घोषणा देत तालुक्यातून बहुजन मुक्ती पार्टीचे शेकडो कार्यकर्ते व महिला या आंदोलनात सहभागी झाले होते येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारने या मागण्यांची दखल गांभीर्याने घेतली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा याप्रसंगी दिला. 


या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हा संघटक माननीय गोरख जगन्नाथ फुलारी, तसेच बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या तालुका प्रभारी पुष्पा बनकर,  तसेच   बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका युवा अध्यक्ष लखन जाधव,  छत्रपती क्रांती सेनेचे अशोक मोरे,  बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हा संयोजक माननीय डॉक्टर दत्तात्रय जगताप,भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हा महासचिव निलेश बनकर, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या माननीय पूजा शिंदे, मा.रवीना दुरगुडे, मा.पुनम जाधव,  तालुक्यातून अनेक संघटनेच्या महिला बचत गटाच्या महिला तसेच युवा कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी विविध संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असल्याचे निलेश बनकर यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News