इंदापूर येथील खुनाचे गुन्हयातील दोघे फरारी अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी


इंदापूर येथील खुनाचे गुन्हयातील दोघे फरारी अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

     बावडा ता.इंदापूर येथील खुनाचे गुन्हयातील फरारी असलेले दोघे आरोपी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

     दिनांक १७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ०७.०० वा.चे सुमारास दादा कांबळे रा.बावडा ता.इंदापूर याने त्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून फिर्यादी मंजुषा महादेव गोरवे वय ५१ वर्षे रा.टाकळी टेंभुर्णी ता.माढा  जि.सोलापूर हिचा मुलगा संजय महादेव गोरवे वय २८ वर्षे यास  त्याचे दोघे मित्र यांचे करवी बोलावुन घेवुन त्याचे नातेवाईक स्त्रिया यांचेशी संजय याचे जवळीक संबध असलेचा संशय घेवुन त्या कारणावरून संगनमत करून दि.१७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ०७.०० वा.चे नंतर ते दि.२० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वा.चे दरम्यान मौजे बावडा गणेशवाडी गावचे हद्दीत फिर्यादीचा मुलगा संजय यास कोणत्यातरी धारधार हत्याराने जिवे ठार मारून त्याचे दोन्ही हात, पाय व डोके कापून कोठेतरी फेकुन देवुन मृतदेह (धड) भिमानदीच्या पात्रात ओळख पटु नये म्हणून फेकुन दिलेबाबतचे  फिर्यादिवरून इंदापुर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

     सदर गुन्हयाचे तपासात यापूर्वी इंदापूर पोलीस स्टेशन कडून ३ आरोपी अटक करण्यात  आलेले होते. गुन्हयातील निष्पन्न असलेले उर्वरीत दोन आरोपी हे गुन्हा घडले पासून फरार होते.

     पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेकडून रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, आज दिनांक १५ जुन २०२१ रोजी गुन्हे शाखेचे पथकाला सदर खुनाचे गुन्हयातील पाहिजे असलेले दोघे आरोपी हे अकलूज जि.सोलापूर येथे येणार असल्याची बातमी मिळालेवरुन त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे १.अजय उर्फ प्रदिप प्रकाश खरात वय २० वर्षे  २.प्रमोद प्रताप खरात वय २१ वर्षे दोघे रा.माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे. आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेवून पुढील अधिक तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे करीत आहेत.

     सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, जनार्दन शेळके, गुरु गायकवाड, अभिजित एकाशिंगे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News