भोर | लॉकअप तोडून फरार झालेला मोक्का मधील दुसरा ही कुख्यात दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद


भोर | लॉकअप तोडून फरार झालेला मोक्का मधील दुसरा ही कुख्यात  दरोडेखोर  स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :  दरोडा,जबरी चोरी, घरपोडी, चोरी या सारखे 10 गंभीर गुन्हे असलेला आरोपी नामे *प्रवीण प्रल्हाद राऊत वय 29 रा.चिखली ता.इंदापूर जि. पुणे* याने पुणे,सातारा, जिल्ह्यात अनेक मोठे गुन्हे करून दहशत पसरवली होती. राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ या गावात पोलिसांचा वेष परिधान करून बालाजी ज्वेलर्स सोनार दुकानावर आपल्या साथीदारांसोबत दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात सोने चांदी लुटून नेली होती. सदर गुन्हेगाराची वाढती दहशत तसेच गुन्ह्याचे प्रकार थांबवून त्यास त्वरित अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

          त्यानुसार सदर गुन्ह्यांचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की वरील आरोपी नामे प्रवीण प्रल्हाद राऊत वय 29 रा.चिखली ता.इंदापूर जि. पुणे   हा चिखली येथे या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पो स्टे चे पथकांना मिळाली होती .त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले व पुढील तपास करण्याकामी राजगड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले होते.त्यावेळी सदर टोळीतील  आरोपीवर *महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999  कलम 3(1)(¡¡) 3(4) प्रमाणे* कारवाई करणार करण्यात आली होती

           दि.17 फेब्रुवारी 2021 रोजी भोर लॉकअप या ठिकाणी पोलीस कस्टडीत असताना लॉकअपचा गज कापून पहाटे 5ते 6 च्या दरम्यान आरोपी चंद्रकांत लोखंडे व प्रवीण राऊत हे लॉकप मधून पळून गेले होते. त्यानुसार *भोर पो स्टे येथे गु.र.नंबर  11 /2021 भा द वी 224,34*  प्रमाणे गुन्हा दाखल होता.

        सदर चा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने पळून गेलेल्या आरोपीस ताबडतोब अटक करण्याच्या सूचना मा.पोलीस अधीक्षक सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर आरोपीचा तपास करण्याचे मोठे आव्हान असताना दिनांक 15/04/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रकांत लोखंडे ला मोठ्या शितापीने खेड शिवापूर येथे पकडले होते .त्यानंतर आरोपी नामे प्रविण प्रल्हाद राऊत हा फरार होता . 

आज दि.15/05/2021रोजी बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की प्रवीण प्रल्हाद राऊत वय 29  हा हॉटेल अरमा टाऊन हाऊस गोरेगाव वेस्ट ,मुंबई येथे असल्याची गोपनीय बतमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने रवाना होऊन सदर आरोपीला ताब्यात घेतले.त्याची झडती घेऊन त्यास ताब्यात घेतले असून त्याची वैदकीय तपासणी करून पुढील तपासासाठी भोर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.

                            सदर आरोपीवर 

1)फलटण शहर पो स्टे गु.र.न 168/2016 भादवी 395


2)बारामती तालुका पो स्टे 286/2015 भादवी 394,34


3)वालचंदनगर पो स्टे 200/2011 भादवी 399,402


4)जेजुरी पो स्टे 256/2020भादवी 392,34


5)भिगवण पो स्टे 237/2019 भादवी 


6)राजगड पो स्टे 509/2020 भादवी 395,397,307 आर्म ऍक्ट 3,25

                       गंभीर व इतर गुन्हे दाखल आहेत.

                   *सदरची कारवाई ही* 

*मा. श्री डॉ. अभिनव देशमुख  पोलिस अधीक्षक सो* , *मा. श्री मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती* *यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिणचे* *मा. श्री वरिष्ठ पोलीस  निरीक्षक.पदमाकर घनवट सो.पोसई अमोल गोरे, पो हवा ज्ञानेश्वर क्षीरसागर, पो.ना राजू मोमीन, पो कॉ अमोल शेडगे, पो कॉ बाळासाहेब खडके, पो कॉ  मंगेश भगत, मपोकॉ पुमम गुंड, मपोकॉ सुजाता कदम, चालक पो हवा मुकुंद कदम, यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News