आक्षेप लिखाणा वर कारवाई ची मागणी


आक्षेप लिखाणा वर कारवाई ची मागणी

सदर निवेदन सादर करतांना अमर घोडके (अहमदनगर जिल्हाउपाध्यक्ष), पवन रणदिवे (तालुकाध्यक्ष), उत्तम पवार (तालुका युवाध्यक्ष), भूषण घाडगे (तालुका उपाध्यक्ष), अक्षय आठवले (तालुका संघटक) शुभम घोडके (शहराध्यक्ष श्रीगोंदा) सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी,  निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काहींना भारत देशाची कायदाव्यवस्था मान्य नाही. कारण, संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. अनावश्यक व चुकीचे लिखाण करणाऱ्या या व्यक्तीने स्वतः देशद्रोही असल्याचे लिखित स्वरुपात स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर इसम हा संविधान विरोधी स्पष्ट होत आहे. या वक्तव्यामुळे भारतीय नागरिक तसेच, सविंधान प्रेमी व आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नमूद झहीर जकाते याचा या जहिरी लिखाणाचा निषेध करीत, कायदेशीर कारवाईबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. कारवाई न झाल्यास "ऑल इंडिया पँथर सेने" च्या माध्यमांतून पँथर स्टाईलने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके यांनी निवेदनातुन दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News