वितरण व्यवस्था व दक्षता समिती सदस्यपदी राजेंद्र गद्रे


वितरण व्यवस्था व दक्षता समिती सदस्यपदी राजेंद्र गद्रे

News network

पुरंदर तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती सदस्यपदी माळशिरस ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक- अध्यक्ष श्री राजेंद्र भुलाजी गद्रे यांची निवड करण्यात आली आहे. नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी निगडित येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मा. पालकमंत्री पुणे यांचे आदेशाने ही समिती गठीत करणेत आली आहे. राजेंद्र गद्रे हे राष्ट्रतेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील माळशिरस आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला तालुकास्तरीय समितीवर काम करण्याची संधी दिली आहे. सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी निगडीत प्रश्नांना न्याय देण्यासाठी या संधीचा चांगल्या प्रकारे उपयोग करू असे राजेंद्र गद्रे यांनी  सांगीतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News