जि.प. लाडजळगाव गटासाठी ०४ कोटी ०७ लाख ७५ हजार भरीव निधी मंजूर :-सौ.हर्षदा काकडे


जि.प. लाडजळगाव गटासाठी ०४ कोटी ०७ लाख ७५ हजार भरीव निधी मंजूर :-सौ.हर्षदा काकडे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण,  जिल्हा परिषद लाडजळगाव गटामध्ये यावर्षी ०४ कोटी ०७ लाख ७५ हजार एवढा भरीव निधी जिल्हा परिषद मधून मंजूर झाला आहे. यामध्ये ठाकूर निमगाव व ठाकुर पिंपळगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामास मंजुरी मिळाली असून लवकरच गटांमध्ये कामे सुरू करणार आहोत अशी माहिती लाडजळगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी दिली आहे.

गेल्या वर्षापासून कोविड-१९ च्या साथीमुळे जिल्हा परिषदच्या निधीमध्ये कपात झाली होती परंतु या वर्षी जिल्हा परिषद मधून ठाकुर पिंपळगाव व ठाकूर निमगाव येथे आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी प्रत्येकी ८८ लाख रुपये तर खरडगाव-४, आधोडी-२, मंगरूळ खुर्द-२ व सुळेपिंपळगाव येथे १ शाळा खोली मंजूर करण्यात येऊन प्रत्येकी साठी ८ लाख ७५ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच सालवडगाव ते मुर्शदपुर रस्त्यासाठी ३० लाख, अंतरवाली बु ते चापडगाव रस्त्यासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंगरूळ बु येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयासाठी १० लाख, मौजे वरखेड येथे स्मशानभूमी बांधकामासाठी ०५ लाख, श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान नागलवाडी येथे भक्तनिवास इमारतीसाठी १५ लाख, कोळगाव येथे साठवण बंधाऱ्यासाठी १५ लाख, लाडजळगाव येथील ढाकणे वस्तीवरील बंधाऱ्यासाठी १५ लाख, नागलवाडी बंधाऱ्यासाठी १५ लाख, कोळगाव येथील कोरडे वस्तीसाठी पाण्याची टाकी व वितरण व्यवस्थेसाठी ०२ लाख, हसणापूर येथे शिववस्तीवरील पाण्याची टाकी व वितरण व्यवस्थेसाठी ०२ लाख, हायमॅक्स बसविण्यासाठी ०९ लाख, माळेगाव ने गावअंतर्गत रस्ता दुरुस्ती करणेसाठी ४ लाख, मौजे खरडगाव झिरपे वस्ती रस्ता करण्यासाठी ०२ लाख, हसणापूर रस्ता दुरुस्तीसाठी ५० हजार तसेच मौजे शेकटे बु व शिंगोरी, गोळेगाव आंबेडकर-नगर, गोळेगाव-इंदिरानगर खुल्या व्यायाम शाळेसाठी एकूण १४ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आता कोविड-१९ आटोक्यात येत आहे. त्यामुळे लवकरच वरील कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे असेही सौ.हर्षदा काकडे म्हणाल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News