शेवगांव तालुका बस स्थानक असुन अडचण नसुन खोळंबा गेल्या दोन वर्षेपासून सुरु असलेले गोगलगायीच्या गतीचे बांधकाम प्रवाशांची डोकेदुखी शेवगाव


शेवगांव तालुका बस स्थानक असुन अडचण नसुन खोळंबा गेल्या दोन वर्षेपासून सुरु असलेले गोगलगायीच्या गतीचे बांधकाम प्रवाशांची डोकेदुखी शेवगाव

प्रतिनिधी सज्जाद पठाण शेवगांव :

शहरातील  बस स्थानक म्हणजे समस्यांचे माहेरघर झाले आहे माता भगिनींना बसायला शेड नाही  पिण्याच्या पाण्याची सोय नाही स्वछता गृह नावालाच आहे तेथेही स्वछ्तेची बोंब आहे लॉक डाऊन नंतर गेली आठ दिवस पूर्ण क्षमतेने सुरु असलेली एसटी बाहेर गावाहून मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांना बसायला चहापाणी घ्यायला नाश्ता करायला कसलीही सोय नाही* सुरु असलेले बांधकाम अजुन इमारतीच्या पायातच  घोटाळत आहे याचा *नेमका फायदा कोणाला ठेकेदाराला का साहेबाना ठेकेदार आणि साहेब तुपाशी आणि प्रवाशी उपाशी* काल रविवार अचानक  जनता लॉक डाऊन जाहीर झाल्याने व बांधकाम सुरु असल्याने  *एस टी  ची कॅन्टीन नाही बसायला बाकडे नाही अचानक पाऊस आला  तर डोक्यावर छप्पर नाही बस स्थानकावर मुक्कामाची वेळ आली तर वेटिंग रूम  नाहीत शेवगांवची प्रवाशी संघटना कागदावरच आहे नवीन बांधकामात बससथनकाला एकाच प्रवेश द्वार आहे त्यामुळे एसटीच्या परिसरातील टपरीधारकांचे काय त्यांचे पुनर्वसन कोण करणार???* दोन वर्षांपासून एस टी चे गाळेधारक विस्थापित झाले आहेत त्यांचे नुकसान कोण भरुन देणार नवीन बांधकाम सहा महिन्यात होणे अपेक्षित होते पण ते हनुमानाच्या शेपटी प्रमाणे लांबतंच चालले आहे *प्रवाशी वाऱ्यावर गाळेधारक वाऱ्यावार परिसरातील छोटे मोठे टपरीधारक धास्तावलेले अशातच ठेकेदाराची मनमानी अधिकारी आणि ठेकेदार मालामाल प्रवाशी बेहाल,  शेवगांव शहराची प्रवाशी संघटना नुसती कागदावर असुन तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचे या सर्व प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे मोठ्या थाटात  भूमिपूजन तत्कालीन परिवहन मंत्री आणि आमदार यांनी केले पण नवीन बांधकाम नको पण प्रवाशांचे हाल थांबवा असे म्हणण्याची पाळी आली आहे.

नवीन इमारतीतील गाळे नेमके कोणाला दिले जाणारं  परिसरातील टपरीधारकांना त्यात किती प्रधान्य दिले जाणारं ???पूर्वाश्रमीच्या गाळेधारकांना न्याय मिळणार का??? बांधकाम राखडवणाऱ्या ठेकेदाराला एस टी दंड करणार का???

जाहिरात
Search
विडिओ
Recent News