मासाळवाडी-लोणीभापकर परिसरात सामाजिक वनीकरणामार्फत वृक्षारोपण


मासाळवाडी-लोणीभापकर परिसरात सामाजिक वनीकरणामार्फत वृक्षारोपण

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील मासाळवाडी याठिकाणी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र बारामती यांच्या वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र या योजनेतून मासाळवाडी ते लोणी भापकर-मुर्टी रोडला  नायकोबा मंदिरानजीक व ढमालेवस्ती येथे १५०० झाडे लावण्यात आली. ही झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली असून यामध्ये करंज, लिंब, उंबर अशा झाडांचा समावेश करण्यात आला आहे. 

नायकोबा मंदिरानजीक वृक्षारोपण करताना बारामती तालुका पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे सल्लागार काशिनाथ पिंगळे व वन कर्मचारी.

    बारामतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल जी.एम. सरोदे, वनरक्षक डी.जे.अवघडे, यांच्या मार्गदर्शनानुसार ही झाडे लावण्यात येत आहेत. 

    बारामती तालुक्यात ३६००० वृक्षांचे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या दुतर्फा, तसेच गायरान जागेत ज्या गावांनी गायरान क्षेत्र दिलेले आहे अशा जागेवर ही झाडे लावण्यात येणार आहेत. वन मजुरांमार्फत या झाडांची देखभाल, संगोपन व संरक्षण करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे यांनी यावेळी दिली.

      यावेळी बारामती तालुका पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे सल्लागार काशिनाथ पिंगळे, पोपट मासाळ, निखिल नाटकर, वन कर्मचारी सुभाष चांदगुडे व मजूर कर्मचारी उपस्थित होते. 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News