जादूगार व बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी सरसावले जादूगार मित्र यांनी फेसबुक लाईव्हव्दारे जादूचे प्रयोग सादर करून जमा केलेल्या रकमेचे वाटप.


जादूगार व बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी सरसावले जादूगार मित्र यांनी फेसबुक लाईव्हव्दारे जादूचे प्रयोग सादर करून जमा केलेल्या रकमेचे वाटप.

पुणे -गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून जगभरात आणि आपल्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे संपूर्ण जग स्तब्ध केले आहे, त्यातच सांस्कृतिक कलाक्षेत्राचे भयावह नुकसान होऊन लाखो कलाकार, जादूगार आणि बॅकस्टेज कलाकार व त्यांचे कुटुंबिय उपासमारीने त्रस्त झाले आहेत. अशातच अनेक संस्था, दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक भावनेने रेशन किट वाटून यथाशक्ती योगदान दिले आहे. परंतु, त्यांच्या बाकी गरजा जसे की "लाईटबिल, घरभाडे, पेट्रोल, दवाखाना, गॅस सिलेंडर यासाठी खिशात पैसे शिल्लक राहिलेले नाहीत या परिस्थितीत कोणापुढे कसा हात पसरायचा याच विचाराने कलाकार मेटाकुटीला आला. परंतु त्यांची हीच हतबलता पाहुन जादूगार भुजंग, जादूगार भरत काकडे, जादूगार प्रसाद कुलकर्णी आणि जादूगार रघुराज (विनायक कडवळे) या चार जादूगार मित्रांनी जाणली आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही चार जादूगार एकत्र येऊन ३० मे २०२१ रोजी सकाळी १० पासून ते रात्री १० वाजेपर्यंत न थांबता सलग १२ तास फेसबुक लाईव्हवर जादूचे प्रयोग सादर केले होते. त्यातून आम्ही स्वाभिमानाने जादूग्रेमी.

रसिक प्रेक्षकांना सोशल मीडिया वरून आवाहन केले होते जर आमचा कार्यक्रम आवडला तरच फक्त ९९ रुपये ची मदत करण्याचे सांगितले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत एकूण ३०,००० रुपये जमा झाले. या रकमेतून प्रत्येकी एक हजार अश्या एकूण ३० गरजू जादूगार कलावंत, बॅकस्टेज कलाकार यांना रोख रक्कम चेक स्वरूपात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते पार पडला तसेच या कार्यक्रमाला मा. शशिभाऊ कोठावळे, मा. मनोज माझिरे, मा. विनोद धोकटे, मा. अरुण गायकवाड व मा. दिलीप गांधी उपस्तिथ होते. यापुढेही आम्ही आमच्या जादूगार बांधवांसाठी ऑल मॅजिशियन वेल्फेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य जादुगार संघटना) या रजिस्टर संघटनेच्या माध्यमातून निधी जमवून मदत करण्याचे ध्येय ठेवले आहे. परंतु यावेळी दानशूर व्यक्तींनी आपले योगदान द्यावे अशी विनम्र आशा आपल्याकडून आम्ही करितो. तसेच ऑल मॅजिशियन वेल्फेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य जादुगार संघटना ) यावेळी जमा झालेल्या निधीनुसार आम्ही ३० जादूगार बांधवांना मदत केली. मदतीकरीता संपूर्ण महाराष्ट्रातात ८८ गरजु कलाकार व सहकलाकार, जादुगार यांनी संपर्क साधला आहे परंतु पुढील उपक्रमामध्ये १०० जादूगारांना मदत पोहचविण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले आहे. आम्हाला ज्या ज्या जादू रसिक प्रेक्षकांनी मदत केली त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News