ओबीसी, व्हीजेएनटीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची पुण्यात बैठक घटनेत दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा वाढवून प्रश्न सोडवावा लागेल - ना.विजय वडेट्टीवार


ओबीसी, व्हीजेएनटीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची पुण्यात बैठक  घटनेत दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा वाढवून प्रश्न सोडवावा लागेल - ना.विजय वडेट्टीवार

- बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार व प्रदेशाध्यक्ष बाळासाहब सानप यांना नगर संघटनेच्या कामकाजाचा लेखी अहवाल देतांना शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, समवेत माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, रमेश सानप, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, विशाल वालकर आदि.

26,27 जूनला लोणावळ्यात चिंतन शिबिर

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही, आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक केल्यास सर्वांचाच प्रश्न सुटेल हा सोपा मार्ग अवलंबून त्याला लोकसभेत घटना दुरुस्ती हा पर्याय आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि ओबीसीची लोकसंख्येनुसार जातनिहाय जनगणना केली तर हा प्रश्न सुटेल, असा विश्वास राज्याचे बहुजन विकास व पुर्नवसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक पुण्याच्या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ना.वडेट्टीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे जे आरक्षण रद्द केले. त्यावर ज्या प्रतिक्रिया विविध चर्चा झाल्या त्या माध्यमातून ओबीसीच्या प्रश्नासाठी पुन्हा एकत्र येत न्याय हक्कासाठी आता लढेल पाहिजे म्हणून आज पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील  पदाधिकार्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजिक केली होती. या प्रश्नांसाठी याच महिन्याच्या 26 आणि 27 जून रोजी लोणावळा येथे 250 प्रतिनिधींची घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अशी महितीही ना.वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.पक्षाच्या पलिकडे जावून विचार करणार्यांशी चर्चा करुन ओबीसीची पुढील वाटचाल आणि दिशा ठरविल जाईल, असे सांगून मंत्री महोदय पुढे म्हणाले, ओबीसी समाज हा कष्टकरी मेहनती काम करणारा समाज आहे. या समाजाचे प्रश्न सुटावे, म्हणून राज्यात ओबीसी एकत्र येतो, त्यांची लढाई ही कोणत्याही समाजा विरोधी नाही, पक्षाविरोधी किंवा संघटनेविरोधी नाही तर ओबीसीच्या हक्कासाठी हा लढा आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण कमी झालं, पूर्ण रद्द झाले नाही. एकूण आरक्षण 50 टक्के असून अनु.जाती, जमाती यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण असून, उर्वरित ओबीसीला आहे. 50 टक्केच्यावर म्हणजे आक्षरणाची मर्यादा वाढवली आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना केली तरच हा प्रश्न सुटेल त्यासाठी लोकसभेत घटना दुरुस्ती करावी लागेल, असे स्पष्ट ना.विजय वडेट्टीवार यांनी केले.

ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनीही या प्रश्नी भुमिका मांडतांना म्हणाले, राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, या लढ्याचं सर्वांना निमंत्रण दिले आहे, त्या प्रमाणे लोणावळ्यातील चिंतन शिबीर आणि त्यापुढे लढ्याची दिशा निश्चित केले जाणार आहे. मंत्री महोदयांनी यावर स्पष्ट सर्व नमूद केले, त्याप्रमाणे कृती करण्यासाठी ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा सक्षमपणे उभा राहणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. 

जालना मोर्चात लाखोंचा समाज रस्त्यावर उतरला होतो. सांगलीत तिच परिस्थिती होणार होती, पण कोरोना प्रादुर्भावामुळे याला ब्रेक लागला ही, दुर्दैवी बाब आहे, पण सर्वच चक्र थांबल्याने नाईलाज झाला असे स्पष्ट करुन ते म्हणाले, त्या दरम्यान राज्यात 10 मेळावे आणि मोर्चे काढून ओबीसी च्या प्रश्नासाठी लढा देण्याचा प्रयत्न होता. पुनश्च हरिओम करीत हा लढा पुन्हा सुरु होत असून, आजची बैठक ही त्याची सुरुवात आहे, असे पत्रकारांना सांगण्यात आले. 

जनमोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्षा साधना राठोड, अॅड.पी.बी.कुंभार (पुणे) नवनाथ पडळकर (बारामती), संजय विभुते (सांगली), बालाजी शिंदे (नांदेड), लक्ष्मण हाके (पंढरपुर), श्री.गडदे (वाशिम), प्रा.भानुदास माळी, प्रा.संजीव जाधव, सोमनाथ काशिद (पुणे), राजेश सटाणकर (नगर) आदिंनी ओबीसी आरक्षणासह ओबीसीचे प्रश्न मांडले. 

ओबीसी, व्हीजेएनटी बारा बलुतेदारसह आठरा पगड जातीच्या लोकांचे संघटन नगर शहरात मजबूत आहे. मान्यवरांसहीत सर्वसामान्यांचा यात समावेश असून, लॉकडाऊनमध्ये सुरक्षित अंतर ठेवून सोशल मिडियाच्या आणि प्रेस - इले.मिडियाच्या माध्यमातून संघटनेचे काम सुरु होते, त्याचा अहवाल यावेळी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. श्री.सानप यांनी नगरला बैठक घेण्याचे निश्चित केले असल्याने त्यांचा दौरा होणार आहे, याची माहिती यावेळी दिली.

पत्रकार परिषद आणि त्यापूर्वीच्या बैठकीसाठी अहमदनगरहून श्री.भुजबळ यांच्यासह माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, रमेश सानप, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, विशाल वालकर, अभिषेक बोराटे, विनायक सानप, सौ.सुषमा पडोळे, सौ.मंगल भुजबळ आदि उपस्थित होते. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News