अनुसूचित जाति अनुसुचित जमातीवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष घालण्याची मागणी.


अनुसूचित जाति अनुसुचित जमातीवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष घालण्याची मागणी.

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

     राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोगाचे सदस्य श्री.सुभाष रामनाथ पारधी यांचा आज पुणे दौरा होता. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात महाराष्ट्रात अनुसूचित जाति अनुसुचित जमातीवर वाढत्या अत्याचाराच्या घटनाकडे लक्ष घालण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनातील तसेच स्थानिक संस्थातील शासकीय सेवेतील  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांच्या विविध पदाच्या हजारो जागा रीक्त आहेत. त्या वर्षानुवर्षे भरल्या गेल्या नाहीत या आरक्षणाच्या सेवेतील जागा भरणेबाबत महाराष्ट्र शासनाकडून  सद्य स्थितीचा अहवाल घेवून त्या शासकीय सेवेतील जागा भरणेबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नामुळे MPSC परीक्षा उत्तीर्ण होवून पात्र उमेदवार आरक्षणाच्या शासकीय सेवेतील नेमणूकसाठी प्रतिक्षेत आहेत. यातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांच्या नेमणूका त्वरीत करण्याची शिफारस करावी तसेच महाराष्ट्रात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटनामध्ये सतत वाढ होत आहे. हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचारप्रतिबंध कायद्याप्रमाणे नोंद झालेल्या गुन्ह्याची एकूण आकडेवारी महाराष्ट्र शासनाकडून घेतल्यास आपल्या निदर्शनास येईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंद कायद्याप्रमाणे पिडीतांना शासनाच्या वतीने मदत निधी दिला जातो. तोही अनेक प्रकरणातील पिडीतांना मदतनिधी शासनाकडून दिलेला नाही.याविषयीची माहिती महाराष्ट्र शासनाकडून घेवून त्या पिडीतांच्या मुलभुत मानवी हक्कांचे रक्षण होणेकामी योग्य त्या शिफारस  राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोगाने राज्य शासनाला कराव्यात अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, संघटन सचिव संजय कांबळे यांनी राष्ट्रीय  अनुसूचित जाति आयोगाचे सदस्य सुभाष रामनाथ पारधी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News