स्व.शंकरराव घुले यांच्या जयंतीनिमित्त हमाल पंचायत येथे अभिवादन


स्व.शंकरराव घुले यांच्या जयंतीनिमित्त हमाल पंचायत येथे अभिवादन

- हमाल पंचायतीचे माजी अध्यक्ष स्व.शंकरराव घुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिन मधुकर केकाण, अशोकराव बाबर, अनिल गुंजाळ, बाळासाहेब वडागळे, नंदू डहाणे, बबन आजबे, नारायण गिते, सतीश शेळके, संजय महापुरे, बहिरु कोतकर  आदि. (छाया : राजु खरपुडे)

स्व.शंकरराव घुले यांनी कामगारांचे जीवनमान उंचावले - अविनाश घुले

 अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -)  स्व.शंकरराव घुले यांनी हमाल-मापाडी, कष्टकर्‍यांसाठी आपले आयुष्य वेचले त्यांच्यामुळेच आज हमालानां त्यांचे हक्क मिळू लागले आहेत. कष्टकार्‍यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी राज्यभर मोठा लढा उभारला,  याची शासनाला दखल घ्यावी लागली. कष्टकार्‍यांचे जीवनमान उंचविण्यासाठी पतसंस्थेची स्थापना, हॉस्पिटलची उभारणी करुन रोजगार उपलब्ध केला. हजारो कुटूंबियांना आधार देण्याचे काम करुन  केले आहे. त्यामुळे कष्टकार्‍यांचे जीवन उंचविण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर संघटन मजबूत करुन हमाल-मापाड्यांना हक्क मिळवून दिले. त्याचप्रमाणे स्व.शंकरराव घुले यांनी नगराध्यक्ष असतांनाही अनेक लोकहिताची कामे करुन आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविला. त्यांचे विचार आत्मसात करुन त्यांचे कार्य आपण यापुढेही सुरु ठेवले आहे, असे प्रतिपादन हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी  केले.

     हमाल पंचायतीचे माजी अध्यक्ष स्व.शंकरराव घुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिन मधुकर केकाण, अशोकराव बाबर, अनिल गुंजाळ, बाळासाहेब वडागळे, नंदू डहाणे, बबन आजबे, नारायण गिते, सतीश शेळके, संजय महापुरे, बहिरु कोतकर  आदि उपस्थित होते. याप्रसंगी अशोक बाबर  म्हणाले, स्व.शंकरराव घुले यांनी कष्टकर्‍यांसाठी मोठे योगदान दिले आहे. कष्टकर्‍यांना शासनस्तरावर विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहे. हमाल-मापाड्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम स्व.शंकरराव घुले यांनी केले आहे. त्यांच कार्याचे स्मरण ठेवून आपण काम केले पाहिजे, असे सांगितले.


          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार गोविंद सांगळे यांनी केले तर प्रास्तविक मधुकर केकाण यांनी केले. यावेळी सुनिल गर्जे, किसन सानप, सुनिल गिते, पांडूरंग चक्रनारायण, राजू चोरमले, रविंद्र बोरुडे, राहुल घोडेस्वार, नवनाथ बडे, वाल्मिक सांगळे, बबन सुसे, तबाजी कार्ले, अर्जुन शिंदे, युवराज राऊत, अशोक आगरकर, आसिफ कादरी आदिंसह हमाल-मापाडी उपस्थित होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News