काँग्रेस कमिटीच्या वतीने MSEB च्या उपअभियंत्यांना दिले निवेदन ,


काँग्रेस कमिटीच्या वतीने MSEB च्या उपअभियंत्यांना दिले निवेदन ,

कुरकुंभ:प्रतिनिधी सुरेश बागल :

दौंड शहरातील काँग्रेस कमिटीच्यावतीने महावितरण कार्यालयाला  निवेदन दि.१०-६-२०२१ रोजी देण्यात आले .  शहरातील भारनियमन व इतर बाबीकडे लक्ष देण्यासाठी हे निवेदन दिले असल्याचे काँग्रेस कमिटी दौंड, यांनी यावेळी सांगीतले . दौंड शहरात विजेचे अघोषित भारनियमन केले जाते , कामाच्या नावाखाली दररोज दौंड शहरातील प्रत्येक भागात भारनियमन केले जाते , कधीही मनाला येईल तेव्हा भारनियमन होते  , त्यामुळे दौंडकरांचे चांगलेच हाल होत आहेत . दौंड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष हरेष ओझा  यांनी  वारंवार फोन करून देखील अधिकारी फोन उचलत नाही असे या निवेदनात म्हटले आहे .दोन महिने लाॅकडाउनच्या  कालावधीत उद्योगधंदे , खाजगी नोकरदार , यांच्यावर चांगलीच बेकारीची कुऱ्हाड पडली आहे ,  एखादा नागरिक महावितरणकडे तक्रार घेऊन आला असता ,त्या नागरिकाला नीटनेटकी वागणूक सुद्धा मिळत नाही, वरील सर्व तक्रारीची  योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी , अन्यथा दौंड शहर काँग्रेस कमिटी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही , व त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणवर राहील असेही श्री ओझा यांनी यावेळी म्हटले आहे . यावेळी दौंड शहर काँग्रेस अध्यक्ष हरेष ओझा यांच्यासमवेत दौंड तालुका युवक अध्यक्ष अतुल जगदाळे , दौंड शहर काँग्रेस उपाध्यक्ष महेश जगदाळे ,    सरचिटणीस विठ्ठल शिपलकर , पर्यावरण जिल्हाध्यक्ष तन्मय पवार , चिटणीस रज्जाक शेख, चेतन सायकर हे सर्व कार्यकर्ते  उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News