साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची नियुक्ती करा..... गोकुळ ठुबे


साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची नियुक्ती करा..... गोकुळ ठुबे

शिर्डी प्रतिनिधी,राजेंद्र दूनबळे

महा विकास आघाडीचे सरकार येऊन दोन वर्ष होत आले आहेत अतिशय चांगल्या प्रकारे सरकार काम करत आहेत, सरकार बदलले की महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान वरील अध्यक्ष व ट्रस्टची नेमणूक होत असते, परंतु आताच हायकोर्टाने आदेश देऊन दोन आठवड्यांचा कालावधी ट्रस्टच्या नियुक्तीसाठी दिलेला आहे, मागील काळात देवस्थानचे अध्यक्ष पद हे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पक्षीय बलाबल बघून उमेदवारास देण्यात येत होते,परंतु आता यावेळी साईबाबा संस्थान चे अध्यक्ष पद हे जनतेची सेवा करणारे खरे जनसेवक असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांना देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ ठुबे यांनी केली आहे,निलेश लंके यांचे मागील दोन वर्षापासून चे कोरोना काळातील काम हे देशात सर्वश्रेष्ठ आहे त्यांच्यामागे उत्तम जनाधार आहे आजवर त्यांचे सामाजिक कामाचा ठसा देशभर उमटलेला आहे, आणि म्हणूनच अशा  काम करणाऱ्या आमदारास अध्यक्षपद दिल्यास शिर्डी संस्थान मध्ये नक्कीच जलदगतीने विकास कामे होतील व साई संस्थान ची साईभक्तांची चांगली सोय व कामे निलेश लंके यांच्या माध्यमातून होतील, आज वर 8000 पेक्षा जास्त कोविड पेशंट यांनी बरे केले आहेत, नगर जिल्ह्याचा कोविडचा निम्मा भार खांद्यावर घेऊन ते काम करत होते, आणि अशा काम करणाऱ्यांच्या हाती साई संस्थान चे नेतृत्व दिल्यास साई संस्थानला चांगले अध्यक्ष मिळतील व वेगळ्या धाटणीने काम करणाऱ्या माणसाला अध्यक्षपद जाईल, याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्री गोकुळ ठुबे हे राज्याचे मुख्यमंत्री सन्मानीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खासदार सन्माननीय शरदजी पवार साहेब यांना इमेल करणार आहेत असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News