महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा रोजगार तसेच उद्योग निर्माण अभियान उपक्रम


महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा रोजगार तसेच उद्योग निर्माण अभियान उपक्रम

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

दि १० जून मुंबई राष्ट्रवादी भवन येथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार प्रदान अभियान तसेच उद्योजक निर्माण अभियान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानाची घोषणा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला.

या उपक्रमांतर्गत ५००० विद्यार्थी-विद्यार्थिनींना, युवक-युवतींना रोजगार प्रदान होणार आहे तसेच ५०० उद्योजक निर्माण होणार आहेत. यासाठी शासनाच्या विविध योजनेच्या अंतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवतींना लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.

  आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, स्टॅन्ड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, शैक्षणिक कर्ज योजना, महात्मा फुले महामंडळ, मौलाना आजाद महामंडळ अशा अनेक योजनेचे लाभ मिळवून देऊन कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी जिल्हा स्तरावर जिल्हा समन्वयकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कौशल्य विकास विभागाचे प्रमुख तुषार जगताप यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News