इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी धनाजीराव थोरात यांची नुकतीच निवड झाली.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी धनाजीराव थोरात यांची नुकतीच निवड झाली.

भिगवण ( प्रतिनिधी)नानासाहेब मारकड :

इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी धनाजीराव थोरात यांची नुकतीच निवड झाली.

        धनाजीराव थोरात यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

      ते बाबीर देवस्थान ट्रस्टचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य असल्याने राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

     यापुढील काळात उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे, ना. दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांचे राष्ट्रवादी विचार तळागाळात पोहोचविणार असल्याचे मत नुतन उपाध्यक्ष धनाजीराव थोरात यांनी व्यक्त केले.तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून आपण सोडविणार असल्याचेही  ते म्हणाले.

    दरम्यान जिप सदस्य हनुमंतराव बंडगर ,प्रतापराव पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे,श्रीराज भरणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News