आयईएस, आयएसएस परीक्षांच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर


आयईएस, आयएसएस परीक्षांच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक: नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) भारतीय आर्थिक सेवा (आयईएस) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षा 2020 चे मुलाखत वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं आहे. आयईएस आणि आयएसएस 2020 परीक्षांचे मुलाखत वेळापत्रक अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जारी केले गेले आहे.

19 जुलै ते 22 जुलै 2021 या कालावधीत यूपीएससीकडून आयईएस आणि आयएसएस पदांसाठीच्या मुलाखती दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहेत.

यापूर्वी यूपीएससीकडून आयईएस आणि आयएसएसची पदांसाठीची मुलाखत 19 ते 23 एप्रिल 2021 रोजी होणार होती. मात्र, त्यावेळी देशभरात सर्वत्र करोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. सध्या देशात करोना रुग्णसंख्या काहीसी नियंत्रणात आहे.

सध्या करोना परिस्थिती आणि इतर गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आयोगाकडून 19 जुलै 2021 पासून भारतीय आर्थिक सेवा परीक्षा, 2020 आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2020 यांची मुलाखत चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आयोगाकडून जारी परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

यूपीएससीकडून आयइएस आणि आयएसएस मुलाखत वेळापत्रकामध्ये शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी देण्यात आली आहे. यामध्ये मुलाखतीची तारीख आणि वेळ, रोल नंबर आणि कोणत्या सत्रात आहे त्याचा उल्लेख आहे. आयईएस आयएसएस पदांसाठीच्या नियोजित मुलाखती संपल्यानंतर यूपीएससीद्वारे अंतिम निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांना सर्व वैध कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News