बाबुर्डी येथे शेतकऱ्यांना बांधावर बाजरी बियाणे वाटप


बाबुर्डी येथे शेतकऱ्यांना बांधावर बाजरी बियाणे वाटप

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत बाबुर्डी येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २०२१-२२ पौष्टीक तृणधान्य- बाजरी पीक प्रात्यक्षिकाचे बियाणे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांचे हस्ते शेतकऱ्यांना बांधावर वाटप करण्यात आले.महाडीबीटी मधून अर्ज केलेल्या शेतकरी गटास १० हेक्टर बाजरी पेरणीसाठी २५ शेतकऱ्यांना प्रत्येकी १ एकरसाठी बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच बाजरी लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हुमणी नियंत्रण, प्रकाश सापळ्यांचा वापर, जैविक खतांचा वापर, १० टक्के रासायनिक खतात बचत, फळबाग लागवड याविषयी कृषी पर्यवेक्षक व्ही. एम. चांदगुडे, कृषी सहाय्यक संतोष जायपत्रे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेले शेतकरी व गावचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News