डॉ.प्रल्हाद वडगांवकर उध्या लग्नाचा 55 वा वाढदिवस सत्यशोधक विवाह करून नूतनीकरण करणार


डॉ.प्रल्हाद वडगांवकर  उध्या लग्नाचा 55 वा वाढदिवस सत्यशोधक विवाह करून नूतनीकरण करणार

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :

कन्या डॉ.उज्जवला गुळवणी यांचा देखील अमृतमहोत्सवी जन्मदिन साजरा होणार

पुणे-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे शनिवार दिनांक 12 जून 2021 रोजी 49 निवारा हौ.सोसायटी मध्ये दु.4 वाजता .फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांची बांधीलकी म्हणून आपल्या वयाच्या 86 व्या व पत्नीच्या 78 व्या वर्षी  लग्नाचा 55 वा वाढदिवस सत्यशोधक पददतीने विवाहाचे नूतनीकरण करून साजरा करणार आहेत.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानांतर्गत सुरू केलेल्या सत्यशोधक विवाह केंद्राद्वारे डॉ.प्रल्हाद वडगांवकर आणि सौ.शीला वडगांवकर यांचा 27 वा सत्यशोधक विवाह संघाचे सरचिटणीस व फुले एज्युकेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक हे महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पददतीने सत्यशोधक विवाह लावणार आहेत.

यावेळी त्यांची कन्या डॉ.उज्जवला गुळवणी,बदलापूर हिचा  12 जून रोजीच  50 वा- (अमृतमहोत्सवी) जन्मदिन असल्याने तो देखील सत्यशोधक पददतीने साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने सोसायटी मध्ये फळझाडाचे  वृक्षारोपण देखील केले जाणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News