शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्रकार परिषदेत जाहिर केले.


शिरूर कृषी  उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्रकार परिषदेत जाहिर केले.

शिरूर प्रतिनिधी गजानन गावडे:  शुक्रवार दि.११ रोजी शिरूर कृषी  उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.जास्तीत जास्त संचालकांना सभापतीपदावर काम करण्याची संधी मिळावी म्हणुन पक्षाच्यावतीने अंतर्गत कालावधी निश्चित करण्यात आला होता.त्यानुसार जांभळकर यांचा सभापतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा दिल्यानंतर सभापदीपदाचा राजीनामा दिला असल्याचे यावेळी जाहिर केले.

      यामध्ये प्रामुख्याने सर्व कर्मचा-यांना कोरोना विमा पाॅलीसी,पाबळ उपबजारची स्थापना,कर्मचाऱ्यांना विमा कवच, ईनाममुळे आणि मापाडी अॅपमुळे पारदर्शक कारभार, शेतमालाचे जाहीर लिलाव,पिंपळ्यात जनावरांचा बाजार,तेलबियांच्या बाजारासाठी चालना, तीन दिवसांचा कांदा बाजार पाच दिवसासाठी वाढवणे,मुग व्यापार आधुनिकीकरण,बाजार समितीच्या मालमत्तेचे डिमार्केशन,पाबळ उपबाजार स्थापना,तळेगाव ढमढेरे शेळी मेंढी बाजार स्थलांतर,गांढुळ खत प्रकल्प,वृक्षारोपन,रक्तदान शिबीर,कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करणे,कोविड सेंटरला मदत,मुख्य द्वार सुशोभीकरण,यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या यांसारखे शेतक-यांच्या हिताचे विकासात्मक उपक्रम राबवुन सभापतीपदाच्या कार्यकाळात बाजार समिती नफ्यात आणली असल्याचे यावेळी माहिती सांगताना सभापती शंकर जांभळकर म्हणाले.

            यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार,माजी आमदार पोपटराव गावडे,तालुकाध्यक्ष रविंद्र काळे,माजी सभापती प्रकाश पवार,शशिकांत दसगुडे,संचालक आबासाहेब मांढरे,प्रविण चोरडीया,बंडु जाधव,सतिष कोळपे,सुदीप गुंदेचा,सचिव अनिल ढोकले यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तोट्यात असलेली बाजार समिती ताब्यात आल्यानंतर सभापतीपदाच्या कार्यकाळात शशिकांत दसगुडे यांनी बाजार समिती सुस्थितीत आणली तर शंकर जांभळकर यांनी सभापतीपदाच्या कार्यकाळात नफ्यात आणुन कळस चढवला असल्याचे काैतुक करून सर्वांना संधी मिळावी म्हणुन पक्षाच्या अंतर्गत ठरल्यानुसार जांभळकरांनी राजीनामा दिला असल्याचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News