भारतीय मजदूर संघाने केला हाॅस्पीटल मध्ये काम करणारे यांना कोरोना योद्धा चा सन्मान


भारतीय मजदूर संघाने केला हाॅस्पीटल मध्ये काम करणारे यांना कोरोना योद्धा चा सन्मान

कुरकुंभ:प्रतिनिधी

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा वतीने कोरोना महामारी वर नियंत्रण ठेवण्यासाठी डाॅक्टर, नर्सेस, वाॅर्ड बाॅय ,  सुरक्षा रक्षक, आया, व ईतर संबंधित सेवकांचे महत्वाचे योगदान आहे.  त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी कोरोना काळात काम केलेल्या सर्वांचे अभिनंदन करून सदरचे काम अत्यंत महत्त्वाची देश सेवा, समाज सेवा असून कोरोना कालावधी त हजारो जणांचे प्राण वाचविण्याचे मोलाचं काम केले आहे. अशा सर्वांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात अभिमान वाटत असून भारतीय मजदूर संघाचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे नमूद केले आहे.  

या वेळी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा चिटणीस जालिंदर कांबळे यांनी सदर उपक्रमांची माहिती देवुन  पुणे जिल्हात  अनेक हाॅस्पीटल मध्ये  करोना योद्धा ना सन्मान पत्र वाटण्याची माहिती या वेळी देण्यात आली. 

     सुतिका सेवा मंदिर लक्ष्मी रोड या  हाॅस्पीटल मध्ये ही  सन्मान पत्र वाटपाचा  कार्यक्रम संपन्न झाला. 

      या वेळी कमला नेहरू हाॅस्पीटल च्या अक्षिक्षक डाॅ लता त्रिंबके, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा चिटणीस जालिंदर कांबळे,जन कल्याण समिती चे सेवा प्रमुख  बाळासाहेब पाटोळे,  भारतीय मजदूर संघाचे जिल्हा संघटक विवेक ठकार,  राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघाचे सरचिटणीस दिपक कुलकर्णी, अजेंद्र जोशी, अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद, जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, सचिन मेंगाळे, महानगरपालिका संघटनेचे चिटणीस संजय कांबळे, सौ भाग्यश्री बोरकर ई पदाधिकारी उपस्थित होते. 

     अशाच स्वरूपाचे कार्यक्रम पुणे जिल्हा तील  विविध ठिकाणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News