बजरंगवाडीत कृषी विभागामार्फत शेतकरी बचत गटास सोयाबीन बियाण्यांचे वाटप


बजरंगवाडीत कृषी विभागामार्फत शेतकरी बचत गटास सोयाबीन बियाण्यांचे वाटप

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

कृषी विभागामार्फत शेतकरी बचत गट बजरंगवाडी, लाटे याठिकाणी सोयाबीन बियाण्यांच्या वाटपाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल खलाटे व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब खलाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

        कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड योजनेमध्ये पीक प्रात्यक्षिक या बाबीकरिता नोंदणी केलेल्या शेतकरी बचत गटास सोडत पद्धतीने निवड करून सोयाबीन या बियाण्यांचे वाटप बजरंगवाडी याठिकाणी करण्यात आले.

  यावेळी श्रीहरी शेतकरी बचत गट व जय हनुमान शेतकरी बचत गट बजरंगवाडी यातील २५ शेतकऱ्यांना १० हेक्टरसाठी ५४० किलो बियाणे  वाटप करण्यात आले. 

    यावेळी वडगाव निंबाळकर येथील मंडळ कृषी अधिकारी दीपक गरगडे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण माने, पी.जी. शिंदे, कृषी सहाय्यक राहुल भोसले तसेच बचत गटाचे अध्यक्ष हनुमंत साबळे, अनिल साबळे, रवी खलाटे, राजेंद्र खलाटे, प्रकाश खलाटे, यशवंत जाधव, सुनील मदने व बचत गटाचे शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News