कोविड १९ कुटुंब पहाणी सर्वेक्षणाला आशा स्वयंसेविकांचा विरोध


कोविड १९ कुटुंब पहाणी सर्वेक्षणाला आशा स्वयंसेविकांचा विरोध

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

 शेवगावः  शहरातील कोविड १९ कुटूंब पहाणी सर्व्हेक्षणाचे काम आशा स्वयंसेविकांना न देता अन्य यंत्रणेकडून करावे या मागणीचे निवेदन नगर परिषदेतील डि. सी. साळवे यांना आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष लांडे, संजय नांगरे व आशा स्वयंसेविका यांनी दिले.

 कुटूंब पहाणी सर्व्हेक्षणाचे काम आशा स्वयंसेविकांच्या जॉब चार्ट मध्ये नसल्याने ते अन्य यंत्रणेकडून करून घ्यावे. आशांना हे काम दिलेच तर आवश्यक संरक्षक साहित्य व दैनंदिन पाचशे रूपये भत्ता  मिळावा अशी  मागणी शेवगाव नगर परिषदेतील आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.  

भाकपचे राज्य सहसचिव, आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष लांडे व तालुकाध्यक्ष संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखालील आशा स्वयंसेविकांनी हे  निवेदन बुधवारी ( दि. ९ ) नगर  परिषदेचे  मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना डि. सी. साळवे यांच्या मार्फत दिले.  

निवेदनात म्हंटले आहे की,  शेवगाव शहरातील कोविड १९ कुटूंब पहाणी सर्व्हेक्षण कामाचे आदेश आशा स्वंयसेविकांना देण्यात आले आहेत. पंरतु,  आरोग्य संचनालयाच्या आशा कर्मचा-यांसाठी नेमून दिलेल्या कामांव्यतिरिक्त कामे देऊन नयेत असे आदेश दिलेले आहेत. सर्व्हेचे हे काम नसल्याने त्यास आशांचा विरोध असून ते अन्य यंत्रणांकडून करून घ्यावे.  हे काम दिलेच तर जीव धोक्यात घालून काम करावे लागणार असल्याने आवश्यक साहित्यासह  दैनंदिन पाचशे रूपये दररोज भत्ता मिळावा. सोबत नगर परिषदेचे कर्मचारीचे द्यावेत अशी मागणी संघटनेने केली आहे.

या वेळी अंजली भुजबळ, सुलभा महाजन, सुनेत्रा महाजन, ज्योती ढोले, संगिता पिसोटे, सुनिता सोनटक्के, संगतिता रायकर, रत्नमाला क्षिरसागर, रंजना परदेशी, वैशाली झिरपे, सुरेखा राऊत, वैशाली वाघुले, आरती मोहिते, अलका पाचे, स्वाती क्षिरसागर, अनिता भुजबळ, सुवर्णा साळुंके, वैशाली देशमुख, सुजाता कळंबे, अनिता भुजबळ, पौर्णिमा इंगळे आदी आशा स्वयंसेविका या वेळी उपस्थितहोत्या

जाहिरात
Search
विडिओ
Recent News