महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराय,श्री क्षेत्र जेजुरी येथील कलावंत-जागरण गोंधळ(वाघे-मुरळी)यांस जीवनावश्यक वस्तु चे वाटप


महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराय,श्री क्षेत्र जेजुरी येथील कलावंत-जागरण गोंधळ(वाघे-मुरळी)यांस जीवनावश्यक वस्तु चे वाटप

पुणे विशेष प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:

करोना महामारीच्या लाटेत महाराष्ट्रातील अनेक कुटुंब उपासमारीच्या छायेत आहेत ,  जेजुरीतील  जागरण गोंधळ घालणारे पारंपारीक कलावंतासमोरही  उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे 

ऐन लग्न सराई, यात्रेच्या सीझन मध्ये दोन वर्ष  सातत्याने होत असलेल्या lockdown मूळे उपजीविकेचे सर्व मार्ग बंद असल्याकारणाने  कलावंतांचे  मोठे नुकसान होत आहे , सर्वत्र मदतीचा वर्षाव होत असताना देखील हे  पारंपारिक कलावंत दुर्लक्षित होत आहेत 


ही खंत आणि पारंपारिक कलावंतांप्रती असलेलं प्रेम ध्यानात ठेवून मराठी सिने सृष्टी तील प्रसिद्ध अभिनेते श्री आनंद खुडे यांनी जेजुरीतील जागरण गोंधळ करणाऱ्या कालावंतास    मदत करण्यास पुढाकार घेतला 

 

त्या साठी त्यांनी  पुणे शहरातील त्यांचे व्यावसायिक मित्र श्री दिपक डोंगरे ,  Eco Sanitsafe आणि  MY MOMMYZ FOOD  ह्या कंपनी तर्फे सॅनिटायझर ,मास्क तसेच जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचे आयोजन केले 


 जेजुरीतील पारंपरिक कालावंतास मदत करण्यास पुण्यातील मराठी सिने क्षेत्रातील नामवंतांनी उपस्थिती लावली , अभिनेत्री आणि फॅशन मॉडेल म्हणून ज्ञात असलेल्या विनया डोंगरे ह्यांनी मदतीसाठी मोलाचा हातभार लावला आणि ह्या पारंपारिक कालावंताचं मनोबल राखण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच  ह्या सर्व कालावंतास जास्तीत जास्त  मदत करण्यास सिने सृष्टीतील सर्व मित्र परिवारास आवाहन केले , व्यावसायिक श्री  आनंद पिंपळकर यांच्याकडून सर्व  पारंपारिक कलाकारासाठी मोफत विमा पोलिसी देण्यात आली 


सदर कार्यक्रमास  प्रमोद रणनवरे , प्रीतम पाटील , नितीन कोंढाळकर , संतोष हगवणे , सोमनाथ स्वामी , खुर्ची फिल्म अभिनेत्री श्रेया पासलकर आणि बालकलाकार आर्यन हगवणे , व्यावसायिक शेखर दांगट, तसेच अभिनेते प्रसाद खैरे , अतिष जवळकर , रमेश साठे आणि अविनाश खोचरे हे आदरणीय उपस्थित होते.तसेच ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे संपर्क प्रमुख सागरराज बोदगिरे यांचे ही सहकार्य लाभले.ह्या सर्व  माननीय व्यक्तींनी सर्व समूहास योग्य असे मार्गदर्शन करत मदत कार्याचा श्रीगणेशा ,  शासनाच्या नियमावलीचे कडेकोटपने पालन करून मदतकार्य समाधान पूर्वक पूर्णत्वास नेण्यास  योग्य असे सहकार्य केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News