कोरोनाच्या अनुषंगाने श्रीगोंदा पोलिसांनी १६ लाख६५ हजार १०० रुपये दंड केला वसूल


कोरोनाच्या अनुषंगाने श्रीगोंदा पोलिसांनी १६ लाख६५ हजार १०० रुपये दंड केला वसूल

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी:-सध्या जगभर पसरलेल्या कोरोनाच्या अनुषंगाने श्रीगोंदा पोलिसांनी १९फेब्रुवारी ते ०८जून या कालावधीत श्रीगोंदा शहरासह,अहमदनगर ते दौंड रोडवर काष्टी येथे अंतरजिल्हा चेकपोस्ट लावून वाहने चेक करुन विनापरवाना इतरत्र जिल्हयातुन येणाऱ्या नियमबाह्य व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गावोगावी कडक पहारा ठेवला. मात्र शासन आदेशाचे व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षक, माजी सैनिक आणि पोलिस मित्रांची साथ मिळाली. लॉकडाउन सुरू झालेपासून श्रीगोंदा पोलिसांनी राज्य व जिल्ह्याबाहेरुन विनापरवाना आल्याप्रकरणी,बंद काळात दुकान सुरू ठेवणारे , मास्कचा वापर न करणारे,आणि संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अशा एकूण ३९१४ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून सोळा लाख ६५ हजार १०० रुपये दंड वसूल केला.

  श्रीगोंदा पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व प्रशासनाला सहकार्य केले. होम क्वारंटाईन नागरिक घराबाहेर पडू नयेत,यासाठी पोलिसांनी करडी नजर ठेवली. रस्त्यावर व इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली.श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पाटील, पी.एस.आय अमित माळी, सहा.पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर आदी पोलिसांनी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत.

      यावेळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा यापुढेही अशीच कडक कारवाई करण्यात येणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News