शिर्डी साई मंदिर दर्शनासाठी खुले करण्यासाठी ग्रामस्थानचे साई संस्थानला निवेदन


शिर्डी साई मंदिर दर्शनासाठी खुले करण्यासाठी  ग्रामस्थानचे साई संस्थानला निवेदन

विविध मागण्यांचे शिर्डी ग्रामस्थानचे कार्यकारी अधिकारी बगाटे यांना निवेदन

शिर्डी राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

सोमवारी शिर्डी ग्रामस्थांची महत्त्वाच्या विषयावर बैठक संपन्न झाली कोरोणामुळे शिर्डीकर सध्या अनंत संकंटाना तोंड देत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी 6 वा. ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक हॉटेल सिटी हार्ट येथेआयोजित केली होती या वेळी,प्रथम नगराध्यक्ष केलास बापू कोते ,कमलाकर कोते,सुधाकर शिंदे ,सर्जेराव कोते,विजय कोते,निलेश दादा कोते, नितीन कोते,रमेश भाऊ गोंदकर, सुजित गोंदकर अशोक कोते,सुनील गोंदकर,मंगेश त्रिभुवन, दिलीप कोते,सचिन गायकवाड,नितीन धिवर, पत्रकार राजेंद्र दूनबळे ,हेमंत शेजवळ ,राजेंद्र भुजबळ,रवींद्र महाले, राजेन्द्र बनकर ,सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित मध्ये

बैठकीतील विषय खालीलप्रमाणे चर्चा झाली

1) शिर्डी गावात व परिसरात कोरोणा पेशंटची संख्या पूर्णपणे आटोक्यात आली असल्याने सर्व व्यवसाय चालु करणे तसेच साईमंदीर व अन्य मंदिरे चालु करणेबाबद..

2) बाबांच्या काळातील प्रभु श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, सितामाता, प्रभु हनुमान या देवदेवतांसाठी मंदिर उभारुन भक्तांना दर्शनासाठी ठेवावे

3) ग्रामदैवत मारुती मंदीरातील जुन्या बाबांच्या काळातील मुर्त्या पुन्हा मारुती मंदीरात दर्शनासाठी ठेवाव्यात.

4) बाबांनी स्वतः स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केलेले व खड्डा खोदुन पेटते दिवे निघालेले पवित्र असे गुरुस्थान मंदिर पूर्वीप्रमाणेच मोठे करावे. जेणेकरुन पुजा - विधी मंदिराबाहेरुन न होता गाभाऱ्यातुन करता येतील.

5) साईमंदीर परिसरात भक्तांकडुन देणगी गोळा करुन अन्नदान करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल करणेबाबद.

6) साई संस्थान नावाने ट्रस्ट स्थापन करुन वेगवेगळ्या मार्गाने देणग्या गोळा करणा-या विरोधात भुमिका ठरविणे तसेच या ट्रस्टविरोधात  साई संस्थानला कारवाई करण्यास सांगणेबाबद.

यासह काही विषयावर चर्चा करून सदर मागणीचे निवेदन ग्रामस्थानी शिर्डी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी  बगाटे यांना निवेदन दिले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News