शुभांगी शिंदे फलटणकर, मी अहिल्याबाई होळकर बोलतेय एकपात्री चे प्रथम क्रमांक कु श्रावणी शेटे ने पटकावला


शुभांगी शिंदे फलटणकर, मी अहिल्याबाई होळकर बोलतेय एकपात्री चे प्रथम क्रमांक कु श्रावणी शेटे ने पटकावला

पुणे प्रतिनिधी रघुनाथ ढोक:

पुणे ; राजमाता अहिल्याबाई होळकर या एक केवळ महान शासकच नव्हे तर एक अतिशय पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या हे त्यांनी अनेक प्रसंगातून दाखवून दिले आहे.  त्यांनी अनेक युद्धांमध्ये एक साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व करून अनेक विजय संपादन केले आहेत. राजमाता अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्या जयंती निमित्त मी अहिल्याबाई होळकर बोलतेय एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आले होते.                              सध्या कोरोना असल्यामुळे जयंती करता येत नाही पण आजच्या आधुनिक युगात जगात अनेक गोष्टी सोप्या झाला आहे.म्हणूनच एकपात्री प्रयोगाच्या स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत 23  स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धचे परीक्षक म्हणून ऍड रेश्मा वाळिंबे,अंजना सोनवलकर व  सीमा गोडसे यांनी पहिले.                            यावेळी प्रथम क्रमांक कु श्रावणी शेटे,द्वितीय क्रमांक कु वैष्णवी भोळे, तृतीय क्रमांक कु आर्या शिंदे यांनी पटकावले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शुभांगी शिंदे फलटणकर यांनी केले होते.यावेळी त्या म्हणाल्या की राजमाता अहिल्याबाई 

 होळकर यांनी विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता कायद्यात महत्वपूर्ण बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला.तसेच राजमाता अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा अशा भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच त्यांना कुशल समाजसेविका या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News