सायंबाचीवाडीत दोनशे झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा


सायंबाचीवाडीत दोनशे झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) 

बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी नजीक जायपत्रेवस्ती याठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संतोष जायपत्रे यांनी गेल्यावर्षी वडिलांच्या (कै.तात्याराम जायपत्रे यांच्या) वर्षश्राद्धानिमित्त लावलेल्या दोनशे झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

  कै.तात्याराम जायपत्रे यांच्या स्मरणार्थ ५ जून २०२० साली दोनशे जांभळीच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. जिरायत भागात पहिल्यांदाच चांगल्या पद्धतीने वाढवलेल्या वृक्षांचा असा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 याप्रसंगी पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे, बारामती तालुका पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मंगेश खताळ, हनुमंत मोरे, काशिनाथ पिंगळे, संतोष गोलांडे, राजेश मोरे जालिंदर गरुड इ. उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News