पेट्रोल डीझेलच्या दरवाढी विरोधात शिरूर तालुका काँग्रेसच्यावतीने आंदोलन करून शिरूरचे तहसिलदार यांना निवेदन


पेट्रोल डीझेलच्या दरवाढी विरोधात शिरूर तालुका काँग्रेसच्यावतीने आंदोलन करून शिरूरचे तहसिलदार यांना निवेदन

शिरूर प्रतिनिधी गजानन गावडे : पेट्रोल डीझेलच्या दरवाढी विरोधात शिरूर तालुका काँग्रेसच्यावतीने आंदोलन करून शिरूरचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव,खजिनदार महेश ढमढेरे,नगरसेविका संगिता मल्लाव,शहराध्यक्ष अॅड.किरण आंबेकर, युवकचे तालुकाध्यक्ष संकेत गवारे,शहराध्यक्ष अमजद पठाण,राज्य पर्यावरण विभागाचे सरचिटणीस उमेश काळे,तालुका उपाध्यक्ष सचिन पंडीत,अजीम सय्यद,तालुका महिला उपाध्यक्षा सानिका बाळसराफ,अरूणा मोहळ,सरचिटणीस प्रियंका बंडगर,युवती अध्यक्ष शितल आनंदे,

वरील संदर्भीय विषयानुसार आपणांस

शिरूर तालुका काँग्रेसच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व एल.पी.जी.गॅसच्या किंमती भरमसाट वाढवल्या आहेत.पेट्रोलने रू.१०० लिटरचा टप्या पार केला असून डिझेल रू.९२ लिटर झाले आहे.तसेच एल.पी.जी.गॅसची टाकी ९०० रूपये झालेला आहे.ही भाववाढ अशीच चालू राहीली तर डिझेल रू.१०० लिटर होण्यास फार दिवस लागणार नाही.महागाईमुळे नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे.आधीच कोरोनाच्या

जागतीक महामारीने व संकटाने जनता त्रस्त आहे.त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे.केंद्र सरकारच्या या अन्याय दरवाढी विरोधात शिरूर तालुक्यात तळेगाव ढमढेरे येथील पेट्रोलियम पंपांवर आंदोलन करण्यात आले असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News