महागाईच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने निषेध.


महागाईच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने निषेध.

वरवंड(विजय मोरे):-दौंड तालुका काँग्रेस आय कमेटीच्या वतीने व तालुकाध्यक्ष विठ्ठल खराडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ७ जून रोजी सकाळी ११ वाजता या निषेधाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महागाईच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.महागाई व जीवनावश्यक वस्तू तसेच पेट्रोल व डिझेल यांच्या वाढलेल्या किंमती कमी व्हाव्यात यासाठी;सरकारच्या विरोधात चौफुला येथील चौकात वस्तू दरवाढी‌ बाबत तीव्र निषेध करण्यात आला.

    यावेळी दौंड विधानसभा उपाध्यक्ष बापूराव बारवकर,दौंड तालुका सोशल मीडिया अध्यक्ष स्वप्निल सोनवणे,धनंजय शितोळे,अरविंद दोरगे, इस्माईल भाई शेख,महादेव दिवेकर,सचिन रणदिवे,बापू शिंदे, नारायण खळदकर,गणेश दोरगे,करण खळदकर,मोशीन तांबोळी,अल्ताफ शेख व इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News