श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान साठी तीन लाख रुपये कीमतीचे सार्वजनिक शौचालय मंजूर हर्षदा ताई काकडे


श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान साठी तीन लाख रुपये कीमतीचे  सार्वजनिक शौचालय मंजूर हर्षदा ताई काकडे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

गेल्या काही महिन्यापासून कोविड रोगामुळे बराच काळ निघून गेला आहे. परंतु आजचा योग पाहिला तर आजच महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा अनलॉक झाला आणि आजच आपण खुल्या पद्धतीने तालुक्यातील पहिला खुला कार्यक्रम या देवस्थानच्या ठिकाणी होतोय हे आपलं मोठं भाग्यच आहे, एक चांगले सुलक्षण आहे असे प्रतिपादन ॲड शिवाजीराव काकडे यांनी नागलवाडी येथे केले.

 जि.प. सदस्या सौ.हर्षदा काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थानसाठी तीन लाख रुपये किमतीचे सार्वजनिक शौचालय या इमारतीचा आज भूमिपूजन कार्यक्रम नागलवाडी येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प. सदस्या सौ हर्षदा काकडे, केदारेश्वर देवस्थानचे मठाधिपती ह भ प बाबागिरी महाराज, जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, राजूभाऊ पोटफोडे, नागलवाडीचे सरपंच ॲड. किरण जाधव, ग्रा.पं. सदस्य संदीप गीते, मा.सरपंच गोरख खेडकर, किसनराव राठोड, नवनाथ फुंदे, नवनाथ खेडकर, रामजी गीते सर, बप्पासाहेब बर्डे, ॲड.बाळासाहेब शिंदे, दुर्गाजी रसाळ, ग्रामसेवक शिनगारे भाऊसाहेब, कॉन्ट्रॅक्टर भारत लांडे आदि यावेळी उपस्थित होते.

 यावेळी पुढे बोलताना अॅड. काकडे म्हणाले की, आज आपण सर्व जण एकत्र आलो आणि एकत्र येऊन घेतलेला निर्णय नेहमी योग्यच असतो. आजच्या या विकासकामांमुळे नागलवाडी व केदारेश्वर देवस्थानच्या विकासामध्ये अजून एक भर पडली आहे. मागील महिन्यामध्ये महाराजांनी निधी मंजुरीबद्दल आभारपर बातमी दिली. यातून काम करणाऱ्याला अधिक बळ मिळते. आम्हाला इथे आल्यानंतर या देवस्थानचा साक्षात्कार, एक अनुभूती ही प्रत्येक वेळेला येते. इथे आल्याचा जो आनंद मिळतो तो इतरत्र कुठेही मिळत नाही. कारण येथील महत्त्व एक वेगळ्या प्रकारच आहे. मानवी जीवनाला कोविडसारख्या भयंकर रोगाने विळखा घातला आहे तो विळखा मुक्त करण्याची मी महादेवाला प्रार्थना करतो. सौ. हर्षदा काकडे यांनी लाडजळगाव गटात नागलवाडीमध्ये एक बंधारा मंजूर केला आहे. या देवस्थानासाठी जवळपास ४० लाखांचा निधी आणला आहे. खर म्हणजे हे कार्य करताना जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. १९४० सालापासून आबासाहेबांनी आम्हाला जी वाट दाखवली त्या वाटेवर आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत असेही ते म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News