शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीत प्राथमिक शिक्षिका समिराबेगम मोहम्मद वसीम यांचे उल्लेखनीय यश


शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीत प्राथमिक शिक्षिका समिराबेगम मोहम्मद वसीम यांचे उल्लेखनीय यश

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

 कोरोना संकट काळात शाळा बंद असल्या तरी शहरातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू मुले या शाळेतील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षिका समिराबेगम मोहम्मद वसीम   त्यांच्या  यु ट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून राज्यातील तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

येथील शेवगाव उर्दू मुले शाळेतील तंत्रस्नेही  शिक्षिका समिराबेगम मोहम्मद वसीम यांनी सुमारे दोन वर्षांपुर्वी उर्दू एज्युकेशनल व्हिडिओ या यू-ट्यूब चॅनलच्या मदतीने शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीला प्रारंभ केला होता. शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीचे राज्याचे मार्गदर्शक भुषण कुलकर्णी व एकनाथ कोरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांनीही मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

शिक्षिका समिराबेगम यांनी इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमातील सर्व विषयांतील धड्यांवर उत्कृष्ट असे  शैक्षणिक व्हिडीओ तयार करून ते त्यांच्या यु ट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहेत. त्यांच्या यु ट्यूब चॅनेलला आतापर्यंत सुमारे  तीन लाखाहून अधिक व्हियू तसेच १० हजार सबक्रायर्स मिळाले आहेत. यावरून कोरोना लॉकडाऊन काळात त्यांच्या शैक्षणिक व्हिडीओंचा उर्दू माध्यमातील शेवगाव तालुका, जिल्हा व राज्यातील तीन लाखाहून अधिक  विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्हिडीओंचा अभ्यासाठी वापर केला आहे.  काही व्हिडीओ मराठी व इंग्रजी माध्यमातूनही तयार केल्याचे शिक्षिका समिराबेगम यांनी सांगीतले.  या यशाबद्दल  जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, पं.स. सभापती डॉ. क्षितीज घुले,  जि.प. उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, प्राथमिक शिक्षक बॅंकेचे चेअरमन सलिमखान पठाण आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

-  तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षिका समिराबेगम मोहम्मद वसीम यांच्या उर्दू एज्युकेशनल व्हिडिओला यु ट्यूबवर व्हियू वाढल्यानंतर यु- ट्यूबने त्याची दखल घेतली.  यु - ट्यूबने जाहिरातींच्या माध्यमातून मिळणा-या रकमेतून काही रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर दरमहा वर्ग करण्यास सुरूवात केली आहे.  

----------------------------------------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News