आशा सेविका ,कोरोना योद्धे यांना वा-यावर-- सौ हेमलता घोरपडे शिव राष्ट्र सेना


आशा सेविका ,कोरोना योद्धे यांना वा-यावर-- सौ हेमलता घोरपडे शिव राष्ट्र सेना

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) 

शिव राष्ट्र सेना पक्षाच्या कामगार जिल्हाध्यक्ष सौ हेमलता घोरपडे यांनी निवेदनात सांगितले की, आज कोरोना -19 या महामारीत समाजातील काही घटक देवदूत बनवुन आशा सेविका व वार्डबाॅय यांच्या रुपाने जनतेच्या घरात जाऊन पाॅझिटिव रूग्णांची सेवा करतात व आपला जीव धोक्यात घालवून कोरोना काळात आशा ताई सेवा देतात. तरी हे बेफिकीर प्रशासन इतर गोष्टींची कोटी रूपयांची उधळपट्टी करत असताना. आशा ताईंना फक्त 1000 रू मानधन देते. हे एक मोठे नगर करांचे दुरदयव म्हणावे लागेल. यात आशा सेविकांना 5000 मानधन मिळावे ही शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. 

     तसेच शिव राष्ट्र सेना पक्षाचे पक्षाध्यक श्री संतोष नवसुपे यांनी सांगितले की् एकी कडे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांचा महाराष्ट्र  राज्यासाठीआदेश असताना आशा ताईंना मानधनात डबल वाढ देण्यात यावी तसेच जिल्हा परिषदेच्या आशा ताईंना सात ते आठ हजार रुपये मानधन भेटत असताना मनपा च्या आशा ताईंना 1000 रु कस ?या गोष्टींचे विशेष वाटत आहे या शिवाय आपल्या कामाचा मोबदला मागण्यासाठी अधिका-यांच्या दालना बाहेर या माता भगिनींना तासंतास उभे राहवे लागते. या विरोधात मनपा आयुक्त श्री शंकर गोरे साहेब यांनी लक्ष घालून योग्य न्याय आशा ताईंला दयावा ही शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. 


           

जाहिरात
Search
विडिओ
Recent News