पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या बारामती तालुकाध्यक्षपदी मंगेश खताळ यांची फेरनिवड


पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या बारामती तालुकाध्यक्षपदी मंगेश खताळ यांची फेरनिवड

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील तरडोली येथील मंगेश खताळ यांची पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या बारामती तालुकाध्यक्षपदी नुकतीच फेरनिवड करण्यात आली.

  पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था, भारत या संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे यांच्या हस्ते खताळ यांना निवडीचे पत्र देऊन त्यांची फेरनिवड झाल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. 

    खताळ यांनी ग्रामपंचायतीच्या व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून परिसरातील विविध सामाजिक कार्यात सहभाग घेऊन समाजपयोगी उपक्रम राबवले आहेत, त्यांच्या पर्यावरण, वृक्षारोपण अशा विविध कामांची दखल घेऊन त्यांच्याकडे पुन्हा एकदा पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या बारामती तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

   यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे, मंगेश खताळ, काशिनाथ पिंगळे, हनुमंत मोरे, राजेश मोरे, संतोष गोलांडे, जालिंदर गरुड, संतोष जायपत्रे इ. उपस्थित होते. यानिवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   संस्थेने जो माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली आहे ती मी योग्य रीतीने पार पाडेल, संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण, पर्यावरणास पूरक अशी कामे करून दिलेल्या संधीचं सोनं करेन असं खताळ यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News