बाबुर्डीत माझे गाव, माझी जबाबदारी कार्यक्रम संपन्न


बाबुर्डीत माझे गाव, माझी जबाबदारी कार्यक्रम संपन्न

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बाबुर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने माझे गाव, माझी जबाबदारी ह्या मोहिमेंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबास १ सॅनिटायझर बॉटल, ३ मास्क, १ डेटॉल साबण ह्या कोरोना प्रोटेक्शन किट वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

  कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे, सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, ज्योती लडकत, अनिल हिरवे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

    ग्रामपंचायतीला धनंजय लडकत यांचा ५० झाडे मोफत दिल्याबद्दल आणि अक्षय डांगे यांचा ६५ लिटर सॅनिटायझर दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी मान्यवरांकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण बाबुर्डीत करण्याची मागणी केली. 

    यावेळी उपसरपंच सौ.दिपाली जगताप, मनीषा बाचकर, मंगल लव्हे, दत्तात्रय ढोपरे, नानासो लडकत, सचिन लडकत, अंकुश लडकत, लक्ष्मण पोमणे, राजकुमार लव्हे, शांताराम ढोपरे, गोरख खोमणे, सोनबा लव्हे, राजू खोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News