विठ्ठल राव वाडगे यांचे विकासाचे धेय बाळगून राष्ट्रीय सहकारी विकास निगम द्वारे विविध प्रकल्प


विठ्ठल राव वाडगे यांचे विकासाचे धेय बाळगून राष्ट्रीय सहकारी  विकास निगम द्वारे विविध प्रकल्प

श्रीगोंदा(प्रतिनिधी अंकुश तुपे)

सरकार महिला आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहे त्याची माहिती घेऊन अर्थसहाय्य मिकविल्यास निश्चितच विकास होईल विठ्ठलराव वाडगे यांनी विकासाचे ध्येय बाळगून राष्ट्रीय सहकारी विकास निगम द्वारे विविध प्रकल्प राबवून शेती पूरक,महिला उद्योजक,बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी विकास निगम पुणे चे रिजनल डायरेक्टर लेफ्टनंट कर्नल विनीत नारायण यांनी वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटी च्या वर्धापनदिन निमित्ताने कार्यक्रमात काढले

अध्यक्षस्थानी जि. प. माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस होते

विनीत नारायण पुढे म्हणाले शेतीपूरक,ग्रामीण उद्योगासाठी सरकार ३३ते७५टक्के पर्यंत अनुदान देत आहे आपल्याला माहिती नसल्याने योजनेचा लाभ मिळत नाही लोकांनी गट तयार करून पुढे यावे

चार्टर्ड अकाऊंटट अमोल देशमुख म्हणाले ९वर्षाच्या काळात सुरुवातीला ५वर्षात वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट कडे ३४कोटींच्या ठेवी होत्या  नंतर ३ वर्षात १००कोटी ठेवी झाल्या याचे श्रेय संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांना जाते कष्ट,सचोटी,ध्येय याचा संगम वाडगे यांच्या मध्ये दिसून येतो

तर बाबासाहेब भोस यांनी अध्यक्ष पदावरून बोलताना विठ्ठलराव वाडगे यांनी बँकिंग क्षेत्रात केवळ कर्जवाटप करून व्याजरूपी नफा कमावणे हे उद्धिष्ट न ठेवता जनावरे छावण्या,लॉकडाऊन काळात किराणा किट,अन्नछत्र,चैतन्य बाजार समिती,विविध प्रक्रिया उद्योग यातून हजारी कुटुंबाना जोडण्याचा यशस्वी प्रयोग केला सामाजिक बांधिलकी कृतीतून साकारली

यावेळी १कोटी रुपये बचत गट वाटप प्रतिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले

प्रस्तविकात शरद गावडे यांनी ९००बचत गटातील सुमारे १०हजार महिलांना कर्ज वाटप केल्याचे तसेच विविध योजनांची व भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी,प.स.सदस्य सौ.कल्याणी लोखंडे,चैतन्य महिला बचत गट सह.पतसंस्था चेअरमन सौ.रुक्मिणी वाडगे,आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुयोग धस,,सुधाकर वांढेकर, प्रदीप आठरे,रमेश गावडे,केशव महाराज,दादा सकट,रमेश गावडे यांनी परिश्रम घेतले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News