शरद भगत यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस बांधवांना मास्क वाटप


शरद भगत यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस बांधवांना मास्क वाटप

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

मुर्टी (ता.बारामती) येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शरद भगत यांच्या वाढदिवसानिमित्त व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोरोना वॉरियर्स म्हणून जनतेची सेवा करीत असलेले व समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे पोलिस प्रशासन यांना मास्क वाटप करण्यात आले.

     वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन अंकित करंजेपुल पोलिस दुरक्षेत्रातील पोलिस बांधवांना मास्क देऊन त्यांच्या आरोग्यासाठी ईश्वराकडे यावेळी प्रार्थना करण्यात आली.

  याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अक्षय गायकवाड, सोशल मिडिया सहसयोंजक पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सचिन मोरे, सोशल मिडिया जिल्हा सहसंयोजक-अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य बाळासाहेब बालगुडे उपस्थित होते. मुर्टी गावच्या पोलिस पाटील तृप्ती गदादे यांनी मार्गदर्शन केले व संदेश जगताप यांनी मास्क उपलब्ध करून दिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News