मढेवडगाव येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा: ग्रामपंचायने कोरोनायोध्या महिला कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन सन्मान केला.


मढेवडगाव येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा: ग्रामपंचायने कोरोनायोध्या महिला कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन सन्मान केला.

श्रीगोंदा प्रतिनिधी अंकुश तुपे दि.६: स्मार्ट ग्राम मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली. आदर्श गाव प्रणेते प्रा. फुलसिंग मांडे यांच्या सुनियोजित मार्गदर्शनात साकारलेल्या दुसऱ्या कोरोना लाटेतील  जिल्ह्यातील सर्वात पहिल्या कोविड केंद्र व गावातील शासरोक्त कोरोना  प्रतिबंधात्मक उपक्रमात आणि कोविड सेंटर मध्ये महत्त्वाचे योगदान दिलेल्या डॉक्टर, स्वयंसेवक, स्वयंपाकी, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक,-माध्यमिक शिक्षक, स्वयंसेवी संघटना, बचत गट, यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे आरोग्य विषयक सर्वे करण्यात महत्त्वाची भूमिका  बजावलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक-माध्यमिक शिक्षिका व कोरोना महामारी संकटात ज्या महिलांनी महत्वपूर्ण मदत केली त्यांचा ग्रामपंचायत व भैरवनाथ कोविड केंद्रातर्फे साडी-चोळी देऊन खणानारळाने ओटी भरण्यात आली.

             रविवारी सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली भगवी पताका फडकवण्यात आली. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गौरव गीत गाऊन घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या भैरवनाथ कोविड केंद्रासाठी स्वयंस्फूर्तीने विनामूल्य योगदान दिलेल्या डॉ. विठ्ठल गवते, डॉ., प्रवीण नलगे, डॉ. अभय शिंदे व डॉ. महावीर भंडारी व केंद्राला भोजनाची व्यवस्था करणाऱ्या आप्पासाहेब भोसले यांचा विशेष सत्कार करून त्यांना प्रत्येकी ११ हजार रुपये मानधन दिले परंतु या सर्वांनी हे मानधन ज्या प्राथमिक शाळेत कोविड केन्द्र होते त्या जिल्हा परिषद शाळेला ५० हजार रुपये देणगी देऊन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कोविड केंद्रात अहोरात्र योगदान दिलेले ग्रामपंचायत कर्मचारी, संघर्ष फाउंडेशन, व निस्वार्थ योगदान दिलेल्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. 

       यावेळी सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच जयश्री धावडे, पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे, माजी संचालक विक्रमसिंह वाबळे, उदयसिंह वाबळे, चेअरमन बापूसाहेब वाबळे, वसंतराव उंडे,ग्रामविकास अधिकारी बी. ए. माने,  संतोष गुंड,राजाराम उंडे, प्रमोद शिंदे, गणेश मांडे, रावसाहेब मांडे, गेणाभाऊ मांडे, सचिन उंडे, साहेबराव उंडे, भास्कर झिटे, गोरख उंडे, निलेश गोरे, शरद मांडे, विकास शिंदे, निखिल ईरोळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. फुलसिंग मांडे यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण मांडे यांनी तर आभार अमोल गाढवे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News