पंचायत समितीच्या वतीने "शिवस्वराज्य दिन" उत्साहात साजरा


पंचायत समितीच्या वतीने "शिवस्वराज्य दिन" उत्साहात साजरा

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक     

 बारामती दि. 6 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन. शिवस्वराज्य दिनानिमित्त पंचायत समितीच्या प्रांगणात सभापती निता फरांदे यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन व स्वराज्य गुढीस श्रीफळ वाढवून पंचायत समिती, बारामतीच्या वतीने शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


पंचायत समिती, बारामतीच्या प्रांगणात आज झालेल्या शिवस्वराज्य दिन कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे , उपसभापती रोहित कोकरे, माजी जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य सभापती संभाजी होळकर, माजी उपसभापती पंचायत समिती  शारदा खराडे, प्रदिप धापटे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व  महाराष्ट्र गीताने झाली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News