पळशी परिसरात मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे नागरिक त्रस्त!! टॉवर असून अडचण नसून खोळंबा


पळशी परिसरात मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे नागरिक त्रस्त!! टॉवर असून अडचण नसून खोळंबा

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) बारामती तालुक्यातील पळशी या परिसरात जिओ मोबाईल कंपनीच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या पंधरवड्यापासून याठिकाणी कॉल व्यवस्थित येत नाहीत किंवा जात नाहीत आणि जर एखादा फोन आला व उचलला तर मध्येच आवाज गायब होतो किंवा अडखळत आवाज येतो. याअभावी फोन कट करावा लागतो. अनेकजण एकच फोन पुन्हा पुन्हा लावून वैतागत आहेत. 

     तसेच मोबाईलला रेंज नसल्यामुळे एखादा ऑनलाईन व्हिडिओ पाहायचा म्हटलं तरी तो डाऊनलोड होत नाही किंवा व्यवस्थित पाहता येत नाही. ऑनलाईन शिक्षण, प्रशिक्षण, क्लासेस, परीक्षा, झूम मिटिंग इत्यादी समस्यांना तेथील विद्यार्थ्यांना, नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. 

  याबाबत विचारणा केली असता वरुनच प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम सॉल होईल असे सांगण्यात येत आहे. 

  यासंदर्भात कंपनीने याकडे लक्ष द्यावे नाहीतर अनेक ग्राहक सिमकार्ड बदलण्याच्या विचारात आहेत असे मत पळशी येथील त्रस्त ग्राहकांनी व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News