पर्यावरण दिनानिमित्त देऊळगाव गाडा येथे 200 झाडे लावण्याच्या अभियानाचा प्रारंभ


पर्यावरण दिनानिमित्त  देऊळगाव गाडा येथे 200 झाडे लावण्याच्या अभियानाचा प्रारंभ

विशेष प्रतिनिधी मिलिंद शेंडगे:

 देऊळगाव गाडा  (ता. दौंड) येथे सरपंच विशाल बारवकर यांनी 200 झाडे लावण्याच्या अभियानाचा प्रारंभ जागतिक पर्यावरण दिनी वृक्षरोपणाने करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य ,अक्षय बारवकर ,अमोल रासकर, बंटी शेठ शितोळे, अमोल पवार, राहुल शेठ जाधव, स्वप्निल शितोळे ,अभिजित जगताप, सुनील विधाटे, सागर रासकर, आवी बारवकर, व ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच विशाल बारवकर म्हणाले की, वृक्षरोपण मोहिम ही सामाजिक चळवळ म्हणून पुढे येण्याची गरज आहे. समाजात पर्यावरणसंबंधी जागृती होत असताना पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय आहे. कोरोनाच्या संकटकाळात पर्यावरणाचे महत्त्व सर्वांना पटले आहे. वाढते शहरीकरण व रस्ता रुंदीकरणामुळे अनेक झाडे नाहीसी झाली. झाडांची ही उणीव भरुन काढण्यासाठी देऊळगाव गाडा व रस्ते हिरवाईने फुलविण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच विशाल बारवकर यांनी उन्हाळ्यात रखरखत्या उन्हापासून रस्त्यांच्या कडेला वृक्षाखाली विसावा घेताना वृक्षांची खरी गरज समजते. तर कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने झाडांचे महत्त्व पटले. रस्त्यांच्या दुतर्फा झाडांमुळे रस्ता शोभून दिसतो तर पर्यावरणाचे समतोल देखील साधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. - सरपंच विशाल बारवकर यांनी नैतिक जबाबदारी म्हणून वृक्षरोपण व त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News