महाराष्ट्राच्या पुरोगामत्वाला कलंक लावत प्रशासनात सामाजिक विषमता वाढवणारा राज्य शासनाचा निर्णय ऑल इंडिया पँथर सेना.


महाराष्ट्राच्या पुरोगामत्वाला कलंक लावत प्रशासनात सामाजिक विषमता वाढवणारा राज्य शासनाचा निर्णय  ऑल इंडिया पँथर सेना.

श्रीगोंदा, अंकुश तुपे प्रतिनिधी

 ०७ मे २०२१ च्या पदोन्नती मधील आरक्षण संपुष्टात आणणारा शासन निर्णय रद्द करणेबाबत स्थानिक प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले. श्रीगोंदा ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारने दिनांक ०७ मे २०२१ रोजी एक शासन निर्णय काढून मागासवर्गीयाचे पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात आणले आहे. यापुढे दिनांक २५ मे २००४ च्या स्थितीनुसार पदोन्नतीचे रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्यात येणार असे ठरवले असतांना, हा आपला जातीवादी निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामत्वाला कलंक लावणारा ठरणार असून, महाराष्ट्रातील प्रशासनात सामाजिक विषमता वाढवणारा असल्याचे ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या श्रीगोंदा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्र त्यांनी माध्यमांना दिले आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदयात सदरील निवेदन महसूल व पोलीस प्रशासनामार्फत महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आहे.


या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. की, यापूर्वी मा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पदोन्नतीतील आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘मागासवर्गीय कायदेतज्ञांची समिती स्थापन करून, त्यांच्या शिफारसी लक्षात घेत, पदोन्नतीतील आरक्षण देण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी. अन्यथा, आपणास कोणालातरी खुश करायचे आहे. आणि त्यामुळेच आपण आमच्या संविधानिक अधिकारांचा बळी देत आहात असा आमचा समज होईल. तरी, हा शासन निर्णय त्वरित रद्द करून, सरकारने पदोन्नतीतील आरक्षण देवून, संविधानाचा सन्मान करावा. अन्यथा मागासवर्गीय समाज समवेत घेवून, ऑल इंडिया पँथर सेनेच्या नेतृत्वात राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे आव्हानात्मक निवेदन ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहे. तहसीलदार प्रदीप पवार व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना या निवेदनाच्या प्रती सादर करीत पदाधिकार्‍यांच्या भावना राज्य शासनाला कळविण्याची विनंती करण्यात आली आहे. निवेदन देताना अमर दीपक घोडके (जि. उपाध्यक्ष, अहमदनगर), पवन रणदिवे (तालुकाध्यक्ष श्रीगोंदा), भूषण घाडगे (तालुका उपाध्यक्ष), अक्षय आठवले (शहर अध्यक्ष), शुभम घोडके, कुमार घोडके, तृषाल ससाणे, ऋषिकेश घोडके, अमर्त्य घोडके, संदीप ससाणे, दीपक लोखंडे, कृष्णा ससाणे, शुभम घाडगे, अजय घोडके, अक्षयकुमार शिंदे सह ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News