बाजारपेठ खुली करावी यासाठी शिवसेना नेते विक्रम राठोड यांचे आता आदित्य ठाकरेंना साकडे


बाजारपेठ खुली करावी यासाठी शिवसेना नेते विक्रम राठोड यांचे आता आदित्य ठाकरेंना  साकडे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत ) : नगरची बाजारपेठ खुली करावी या मागणीसाठी आता शिवसेना नेते , माजी नगरसेवक विक्रम अनिलभैय्या राठोड यांनी थेट राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाच साकडे घातले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी ठाकरे यांना इमेल केले असून नगरच्या व्यापाऱ्यांची व्यथा व समस्या आदित्य साहेबांपर्यंत पोहोचावी त्यासाठी त्यांनी समाज माध्यमांची देखील मदत घेतली आहे. 

              यात त्यांनी म्हंटले आहे की ,  सध्या राज्यात अन लॉक 6 ची प्रक्रिया सुरू आहे. या निकषात नगर शहर पूर्ण पणे बसते आहे. म्हणजे ज्या शहरात कोरोंना लागण होणार्‍या रुग्णांची संख्या 10 टक्क्यांच्या आत आहे. उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर व ऑक्सीजन बेड्स ची संख्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या निकषाची पूर्तता करूनही नगर शहराला अन लॉक ५ चा फायदा मिळत नाही ही वस्तू स्थिती आहे. नगर शहरापेक्षा कैक पटीने जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांना दुपारी २ पर्यंत बाजारपेठ खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नगर शहरात अवघे ३६ रुग्ण आहेत. जिल्ह्यात फक्त ११०० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पण जिल्ह्याची लोकसंख्या देखील ६० ते ६५ लाखांच्या घरात आहे . त्या तुलनेत या  बाधित रुग्णांची टक्केवारी अतिशय नगण्यच आहे. इतके सगळे असूनही जिल्हा प्रशासन, अहमदनगर महानगरपालिका नगर शहरातील व्यवहार अंशतः सुरळीत करण्यास परवानगी देत नाही. यासंदर्भात आपण पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते ना. हसन मुश्रीफ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील फोनवरून बोललो होतो. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली होती. पण अद्याप पुढे काहीच हालचाल झाली नाही. 

             वास्तविक नगर शहरातील व्यापारी वर्ग हा गेल्या ३०-३५ वर्षांपासून शिवसेनेलाच पाठिंबा देत आहे. सलग पाच टर्म शिवसेना आमदार, माझे वडील  हिंदू धर्मरक्षक स्व. अनिल भैय्या राठोड साहेब याना निवडून देण्यात  या व्यापाऱ्यांचा दरवेळी सिंहाचा वाटा होता. वर्षानुवर्षे आपल्या पक्षाची पाठराखण करणाऱ्या व्यापारी वर्गाला या कोरोना लॉक लॉक डाउनच्या दोन वर्षात खूप हालापेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. 

           संपूर्ण राज्य अनलॉक होत असताना नगर शहरातील व्यापाऱ्यांना मात्र आपले व्यवसाय सक्तीने बंद ठेवावे लागत आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांना घरबसल्या काम न करता पगार दिले. मोफत किराणा व औषधोपचार दिले. पण आता या व्यापाऱ्याकडे या कर्मचाऱ्यांना पगार करण्यापुरते देखील पैसे उरले नाहीत. तेव्हा कृपया आपण व्यापाऱ्यांच्या भावनेचा सकारात्मक विचार करावा आणि नगरची बाजारपेठ राज्यातील इतर शहराप्रमाणे अंशकालीन सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना फोनवरून सूचना द्याव्यात अशी विनंती विक्रम अनिल भैय्या राठोड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News