डोंबारी समाज आपल्या मागण्या साठी तटस्थ


डोंबारी समाज आपल्या मागण्या साठी तटस्थ

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :

शेवगाव शहरातील डोंबारी वस्तीवरील रोजी रोटी सहअनेक समस्या असून त्यांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.कोरोना कालावधीत त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत असून इथे उपाशी मरण्यापेक्षा प्रांताधिकारी कार्यालयात उपवास, उपोषण करून आत्मदहन केलेले बरे त्या संदर्भात प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन माननीय प्रांताधिकारी साहेब शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे आंदोलन होणार. शेवगाव शहरालगत यशवंनगर येथे डोंगरी वस्ती असून या ठिकाणी राहणारे भटके-विमुक्त समाजाचे 40 कुटुंब सरकारी जागेवर गेल्या पंचवीस वर्षापासून वस्ती करून राहात आहेत. तरी सर्व कुटुंब आजमीतीस शासकीय योजनेपासून वंचित तर आहेतच परंतु त्यांना प्रशासनाने नगरपालिका तर्फे पाणी,रस्ता,आरोग्य,निवारा या कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेले नाहीत तरी त्याच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे 

1) या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून आपण भेट दिल्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने बोरवेल घेऊन दिला.त्यास पाणी लागले.परंतु त्यामध्ये मोटार किंवा बसून दिलेला नसल्याने पाण्याचा उपयोग व घेता येत नाही.

2) आरोग्य सुविधा बाबत सरकारी दवाखान्याच्या मार्फत सर्वांची आरोग्य तपासणी घेण्यात आली. त्यामध्ये दोन ते तीन बालके कुपोषित निघाली परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार सरकारी यंत्रणेत केलेला नाही. ते सर्व आरोग्य सुविधा पासून वंचित आहेत.कोविड19 ढोस त्यांना दिलेली नाही? तरी त्यांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी आरोग्य सुविधा देण्यात यावी.

3) पुढील काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून पावसाळ्यामध्ये वस्तीकडे जाण्यास कच्चा मातीचा रस्ता आहे.पाऊस पडल्यानंतर वस्तीचा व शेवगाव शहराची वहिवाट बंद होते. व संपर्क ही राहत नाही .त्यासाठी आम्ही आमदार मोनिकाताई राजळे व खासदार सुजय दादा विखे यांना तीनशे लोकांचे अर्ज व सह्यांचे निवेदन दिले आहे .तरी सदर रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण लवकरात लवकर करण्यात यावे

4)या वस्तीमध्ये चार ते दहा वर्ष पर्यंत पंचवीस ते तीस मुले हे शैक्षणिक सुविधांपासून वंचित आहेत. सदर ठिकाणी बालवाडी अंगणवाडी होणे आवश्यक आहे .तसेच शिक्षणाची देखील सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याने त्या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक नेमावेत

5)डोंबारी वस्तीवरील लोक हे अतिशय गरिबीचे व हलाखीचे जीवन जगत असून ते बीपीएल कार्ड किंवा योजनेपासून वंचित आहेत. त्यांचे रेशन कार्ड हे वेगळ्या रेशन दुकानांमध्ये जोडले असल्याने रेशन कार्डधारक त्यांना धान्य देत नाहीत.तरी सर्वांचे रेशन कार्ड हे भारस्कर यांच्या रेशन दुकानात जोडण्यात येऊन त्यांना एकाच ठिकाणी स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्यात यावे

6)नगरपालिकेतर्फे 35 लाख रुपये खर्च करून सदर वस्तीवर लाईटीचे पोल टाकून डीपी उभी केली. त्याचे भोगवटा सदरील नावे लावून त्यांना जागेचे सातबारा उतारे देण्यात यावी म्हणजे त्यांना कायदेशीर रित्या घरांमध्ये लाईटीचे कनेक्शन घेता येईल व उतारे मिळाल्याने ते घरकुल योजनेत पात्र होतील. तरी त्यांना उत्तरे देण्यात यावे. व इतर मागण्या संदर्भात संघटनेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब शेवगाव यांच्या कार्यालयाकडे डोंबारी वस्तीवरील कुटुंब दिनांक 03/06/2022रोजी अमरण उपोषण बसणार आहेत तरी सदर समस्या सोडवण्यासाठी आपण आपणाचे सहकार्य महत्त्वाची आहे समस्त डोंबारी वस्तीवरील परिवार व बहुजन मुक्ती संघटना महाराष्ट्र राज्य माननीय बाळासाहेब गायकवाड यांनी हे निवेदन दिले असून यासंदर्भात शासनाचे लक्ष लागावे हीच विनंती.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News