बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी सत्त्याचा प्रहार जागतिक असंघटित कामगार कॉमन श्रमिक संघ मदत करण्याचे आदेश गट विकास अधिकारी बारामती यांनी दिले.


बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी सत्त्याचा प्रहार जागतिक असंघटित कामगार कॉमन श्रमिक संघ मदत करण्याचे आदेश गट विकास अधिकारी बारामती यांनी दिले.

विशेष प्रतिनिधी मिलिंद शेंडगे: बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने इमारत बांधकाम कामगारांची नोंदणी सुरू होणार आहे मजुरां शासना कडुन इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, योजना

*पात्र लाभार्थी :*

▪️बांधकाम कामगार,

▪️गवंडी कामगार, 

▪️यंत्र चालक

▪️बिगारी, 

▪️हेल्पर, 

▪️खोदकाम कामगार, 

▪️प्लंबर, 

▪️वेल्डर, 

▪️फिटर, 

▪️इलेक्ट्रिशन, 

▪️सुतार,  

▪️पेंटर, 

▪️सुरक्षारक्षक

▪️ (एक इमारत किंवा घर उभे करण्यात जे कोणी लागतात ते सर्व)


*योजना*

◆सामाजिक सुरक्षा◆

१) पहिल्या विवाहासाठी 30,000/-

2)हत्यारे खरेदी 5,000/-

3) सुरक्षा संच 

4)अत्यावश्यक संच


*◆शैक्षणिक मदत योजना  (कामगारांच्या 2 मुलांना व पत्नीला)◆*

1) 1ली ते 7वी - दरवर्षी 2,500/-

2) 8वी ते 10वी - दरवर्षी 5,000/-

3)11वी ते 12वी - दरवर्षी - 10,000/-

4)13वी(FY) ते 15वी(TY) - दरवर्षी - 20,000/-

5)16वी(FY M) ते 17वी(SY M) - दरवर्षी - 25,000/-

6)वैद्यकीय अभ्यासक्रम साठी - 1,00,000/-

7)अभियांत्रिकी अभ्यासक्रम साठी - 60,000/-

8)MSCIT साठी आवश्यक फी


*◆आरोग्य विषयक  योजना (संपूर्ण कुटुंबासाठी)◆*

1)पत्नीस नॉर्मल डिलिव्हरीसाठी - 15,000/-

2)सिझेरियन डिलिव्हरी साठी - 20,000/-

3)गंभीर आजार उपचारासाठी - 1,00,000/-

4)75℅ अपंगत्व आल्यास - 2,00,000/-

5)एका मुलीवर कुटुंब नियोजन केल्यास - 1,00,000/-

6)व्यसनमुक्ती केंद्र उपचारासाठी - 6,000/-


*◆आर्थिक◆*

1)कामावर मृत्यू झाल्यास - 5,00,000/-

2)नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000/-

3)घरकुल - 2,00,000/-

4)घर खरेदी किंवा बांधणी साठी 6,00,000/- रुपये पर्यंतच्या कर्जाचे व्याज अथवा 2,00,000/-

5)मृत्यू झाल्यास अंत्यविधी साठी 10,000/-

6)विधवा पत्नीस / विधुर पतीस प्रति वर्षी 24,000/- 5 वर्षांपर्यंत

ह्या सर्व  योजना असंघटित कामगारांन साठी आहे तसेच लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ अनेक गोरगरीब मजुरांवर आली आहे पण शासनाच्या सर्व योजना ह्या गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर स‌त्त्याचा प्रहार जागतिक असंघटित कामगार कॉमन श्रमिक संघ व सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन नोंदणी मोहीम लॉकडाउनच्या नियमांचे पालन करून  सुरू आहे आता बारामती तालुक्यात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News