श्रीगोंदा तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न


श्रीगोंदा तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

श्रीगोंदा प्रतिनिधी अंकुश तुपे :

पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर जयंती निमित्त तालुक्यातील मातोश्री हॉस्पिटल इथे जनकल्याण रक्तदान पिढीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजण करण्यात आले . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुभेदार मल्हारराव होळकर ( युवक क्रांतीकारी परिषद ) आदेश जी शेंडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले  आहे, खरोखरीच रक्तदान करने काळाची गरज असून आपल्या मूळे कोणाचे तरी प्राण वाचत हे सर्वात मोठे पुण्य आहे त्याच प्रमाणे कोविड काळातही आपण स्वतः सुरक्षित राहून 

शासनाच्या नियमाचे पालन केले पाहिजे असे  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा महागडा न्युज रिपोर्टर युवा मल्हार सेना. राष्ट्रीय समाज पक्ष अ.नगर सचिव मिनाताई राहिंज यांनी सांगून आहिल्या देवी होळकर यांच्या विषयी त्यांनी केलेल्या कामाची सखोल माहिती  दिली व सेनिटायजर व मास्क वाटप करण्यात आले  . त्यावेळी महा.राज्य  यशवंत सेनेचे सरचिटणीस किरण खरात.यांनी रक्तदान केले व युवा मल्हार सेना श्रीगोंदा तालुका अध्यक्ष अनिल गडदे यांनी रक्तदान केले या वेळी  कार्यकर्त्यांनी  जवळपास ७५/८० टक्के रक्तदान केले ,या प्रसंगी आहिल्या देवी होळकर यांच्या जय घोषाणे परिसर दनानला,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News