पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतुन राशीनच्या गुन्हेगारीवर तिसऱ्या डोळ्याची नजर


पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतुन राशीनच्या गुन्हेगारीवर तिसऱ्या डोळ्याची नजर

सार्वजनिक ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे; राशीन शहरातील प्रभावी उपक्रम 

कर्जत प्रतिनिधी मोतीराम शिंदे - तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घाळण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी राबवलेल्या अनेक संकल्पना आणि उपक्रम लोकहितासाठी फायदेशीर ठरत आहेत. त्यांच्या याच संकल्पनेतून राशीन शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी येथील मुख्य चौकात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असुन आता याच तिसऱ्या डोळ्याची गुन्हेगारीवर करडी नजर राहणार आहे.

      ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी चंद्रशेखर यादव यांनी राशीन येथील व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून राशीन शहराच्या सुरक्षिततेसाठी आपणच करूया आपल्या संपत्तीचे रक्षण या उपक्रमातून अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.करमाळा चौक, भिगवण चौक व बसस्थानक चौक अशा तीन मुख्य चौकात कॅमेरे बसवण्याबाबत व प्रत्येक दुकानदाराने स्वतःच्या दुकानासमोर १ किंवा २ कॅमेरे बसवण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कृतिशील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राशीन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आदिनाथ मोढळे तसेच अंबिका दूध डेअरीचे मालक भास्कर मोढळे आदींची बैठक पार पडली.त्यांनीही यादव यांच्या या संकल्पनेचे कौतुक करत राशीनच्या करमाळा चौक,भिगवण चौक व बसस्थानक चौकात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.यासाठी आदिनाथ मोढळे यांनी ८५ हजार रुपये,भास्कर मोढळे यांनी २० हजार रुपयांचे ८ सीसीटीव्ही कॅमेरे २ डिव्हीआर, वसीम शेख यांनी ५० हजार रुपयांचे ४ सीसीटीव्ही कॅमेरे १ डिव्हीआर तर माऊली कदम यांनी ३५ हजार रुपये किमतीच्या दोन एलईडी स्क्रीन असे एकूण १ लक्ष ९० हजार रुपये किमतीचे साहित्य दिले.त्यामुळे राशीनचे मुख्य चौक कॅमेऱ्याच्या छायेखाली आले असुन गुन्हेगारीला आळा बसणार आहे.यातून मुलींची छेडछाड करणाऱ्यांनाही चाप बसणार आहे.देण्यात आलेले कॅमेरे हे अद्ययावत असून हे कॅमेरे नाईट व्हिजन सिस्टीमचे आहेत त्यामुळे अंधारात देखील यातुन गुन्हेगार सुटू शकणार नाही.पोलीस निरीक्षक व त्यांच्या या उपक्रमाचे राशीनसह तालुक्यातून कौतुक होत आहे.

   गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्जत पोलिसांकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाठी नागरिकही सहकार्य करत आहेत.राशीन येथील हे अद्ययावत कॅमेरे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेला मदत करतील.सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिलेल्या मान्यवरांचे मी सर्व पोलीस यंत्रणेच्या वतीने आभार मानतो. - पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

जाहिरात
Search
विडिओ
Recent News