कर्तव्य बजावताना दौंड पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन,सापडलेला मोबाईल केला परत


कर्तव्य बजावताना दौंड पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन,सापडलेला मोबाईल केला परत

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : कोरोना महामारी मध्ये संचार बंदी लागू असताना विनाकारण फिरणारे अशांवर दौंड पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे, कर्तव्य बजावत असताना एका व्यक्तीचा रस्त्याच्या कडेला पडलेला मोबाईल पोलिसांनी उचलून त्याच्या ताब्यात देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे, दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरात कोरोना काळात संचारबंदी लागू असताना विनाकारण फिरणारे,विना मास्क फिरणारे, विना लायसन, ट्रिपल सीट आणि नियमांचे उल्लंघन करणारे अशा सर्वांवरच दौंड पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करण्यात येत होती ही दंडात्मक कारवाई सुरू असताना दौंडच्या पोलिसांना रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा पडलेला मोबाईल सापडला दौंड  पोलिसांनी तो उचलून आपल्या गाडीच्या जवळ ठेवला थोड्याच वेळात तो व्यक्ती मोबाईल शोधत त्याठिकाणी आला होता,त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल शेखर झाडबुके, पोलीस कॉन्स्टेबल अमजद शेख, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय घोडके, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत गिरमे,पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, होमगार्ड विनोद लवटे,होमगार्ड जाधव, होमगार्ड भोसले, होमगार्ड गायकवाड, होमगार्ड कांबळे,होमगार्ड रोडे तसेच गोपाळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले हेही त्यावेळी उपस्थित होते,त्या व्यक्तीच्या मोबाईलची शहानिशा करूनच तो मोबाईल त्या व्यक्तीच्या ताब्यात देण्यात आला,त्या व्यक्तीने सर्व पोलिसांचे आभार मानले, दंडात्मक कारवाई करत असताना दौंड पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन घडले त्यामुळे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी त्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News