दौंड | शहरात पेट्रोल ने गाठली शंभरी,आज पेट्रोल 100 रू. 94 पैसे


दौंड | शहरात पेट्रोल ने गाठली शंभरी,आज पेट्रोल 100 रू.  94 पैसे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

कोरोना महामारीत पेट्रोल शंभरीत,दौंड शहरात आज पेट्रोल ने शतक पूर्ण केले आहे,तर डिझेल 92 रुपयावर येऊन ठेपले आहे, पेट्रोल चे भाव गगनाला भिडले आहेत,त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे,2013 सा ली पेट्रोल 71 रुपयांच्या घरात होते, परंतू 2014 नंतर सरकार बदलले आणि सर्वच वस्तूंचे भाव वाढत चालले आहेत,पूर्वी पेट्रोल डिझेल चे भाव पाच सहा महिन्यांनी वाढत होते,त्यामुळे जनतेला भाव वाढ झालेली समजत होती,आणि मग विरोधक पेट्रोल डिझेल वाढ केल्या बद्दल रॅली आंदोलन सुरू करायचे,त्यामुळे किरकोळ दर कमी करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली जायची, परंतू या नव्या सरकारने उत्तम फंडा शोधला आणि पेट्रोल डिझेल चे भाव दररोज बदलले जाऊ लागले आणि सत्तर वर्षात सत्तरीत असलेले पेट्रोल ने शंभरीत कधी प्रवेश केला ते समजलेच नाही,आणि जनतेला आता महागाईचा चटका बसू लागला आहे,पेट्रोल डिझेल बरोबरच खाद्य तेल आणि इतर वस्तूंचा ही भडका उडाला आहे,कोरोना आणि महागाई यांच्या मध्ये सर्वसामान्य कॉमन मॅन भरडला जातोय एवढं नक्की.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News