कोरोनामुळे रोजगार गेलेल्या हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांना मदत-- रितेश पांगारकर


कोरोनामुळे रोजगार गेलेल्या हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांना मदत-- रितेश पांगारकर

कुरकुंभ :प्रतिनिधी सुरेश बागल :                                                               सहजपूर गावातील रितेशआप्पा पांगारकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सहजपूर गावात माकरवस्ती-गौतमनगर येथील हातांवर पोट असणाऱ्या गोरगरीब २०० ते २५०  कुटुंबांना  ३०-५-२०२० रोजी ५:०० वाजता आंबेडकर समाज मंदिरात आमदार आदरणीय राहूलदादा कुल यांच्या शुभहस्ते ११ महिला- जेष्ठ पुरुष नागरिकांना एक हात सहकार्याचा या कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी धान्य व बाजार वितरण करण्यात आला होता बाकीच्या लोकांना ट्रस्टतर्फे घरोघरी जाऊन महिलांच्या हातात मदत किट देण्यात आले होते त्यावेळी राजूशेठ पांगारकर, सिताराम वेताळ, बापू मेहेर, चांगदेव म्हेत्रे, प्रदिप गायकवाड, उमेशराव म्हेत्रे, रितेश पांगारकर, सिद्धार्थ गजधाने, राजेंद्र माकर, पोपट म्हेत्रे, संतोष गायकवाड, प्रकाश मगर, चांगदेव थोरात, गणेश कदम, बापू पांगारकर, महेश म्हेत्रे तसेच भरपूर मान्यवर उपस्थित होते.                                   त्यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की रितेश पांगारकर करीत असलेल्या गरिबांना मदतीचे मी अभिनंदन करतो तसेच समाजातील वंचित-पिडीत लोकांना आधार देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने प्रयत्न करावेत मीही यवत, दौंड,चौफुला येथील कोवीड सेंटरमध्ये तसेच तालुक्यातील गरीब लोकांना औषधौपचार , आॅकसिजन, इंजेक्शन साठी मदत करीत आहे लोकांनी अजून महिनाभर जागरूक, मास्क वापरून सतर्क राहावे असे आवाहन केले आहे. रितेश पांगारकर म्हणाले कोरोनामुळे आमच्या माकरवस्ती -गौतमनगर येथील हातांवर पोट असणाऱ्या गोरगरीब लोकांच्या नोक-या गेल्या आहेत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून मी व माझ्या सहकार्याच्या मदतीने गरीबांना एक घास मदतीचा संकल्पनेतून मी ही मदत केली आहे.प्रास्ताविक राजूशेठ पांगारकर यांनी केले आभार उमेश म्हेत्रे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News